Viral video: लहान मुलांना सायकल किंवा छोटी सायकल चालवताना तुम्ही पाहिलं असेल खऱ्या बाईकवरही लहान मुलं बसतात पण बाईकचं हँडल धरून ती चालवण्याचं नाटक करतात. लहान मूल म्हटल्यावर त्यांना या सर्व गोष्टींचं आकर्षण असतंच. पण त्यांची ही हौस या वयात प्रत्यक्ष करू देणं शक्यच नाही. पालक त्यांना तसं करूही देत नाहीत. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही एका ३ वर्षाच्या चिमुकल्याने चक्क बाईक चालवली आहे. सोशल मीडियावर रोज अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात काही व्हिडीओ रस्त्यावरील बेशिस्त वाहतुकीसंदर्भातही असतात. वाहतूक पोलिस विभागाकडून रस्त्याने वाहन चालवण्यासंदर्भात काही नियम आणि अटी लागू केल्या गेल्या आहेत.
मात्र, अनेक नागरिक सर्व नियम धाब्यावर बसवून बेशिस्तीने वाहन चालवताना दिसतात. त्याचा विनाकारण होणारा त्रास अनेकदा शिस्तीने वाहन चालवणाऱ्या इतर चालकांनाही सहन करावा लागतो. तसेच सध्या सोशल मीडियावर एका लहान मुलाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना पाहायला मिळत आहे; जो पाहून लोक चांगलेच संतापले आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हायवेवर एका बाईकवर एक व्यक्ती बसला आहे आणि त्याच्या पुढ्यातच एक चिमुकला बसला आहे. आश्चर्य म्हणजे या बाईकचं स्टेअरिंग या चिमुकल्याच्या हातात त्या व्यक्तीने दिलं आहे आणि तो स्वत: चक्क हाताची घडी घालून बसला आहे. या चिमुकल्याला बघून तो ३ ते ४ वर्षाचा असल्याचं दिसत आहे. आजूबाजूने भरधाव वेगात गाड्या जात आहेत. तरीही हा व्यक्ती चिमुकल्याच्या हातात बिधांस्त बाईक देऊन बसला आहे. आजूबाजूने जाणारे लोकंही हे पाहून चकित झाले आहेत.
थरारक VIDEO व्हायरल
अतिशय वर्दळीच्या रस्त्यावर गाडी चालवत होता; ज्यामुळे अपघात होऊन हानी होण्याची शक्यताही होती. लहान मुलांना गाड्यांचे आकर्षण जरी असले तरी प्रत्यक्षात मात्र १८ वर्षांखालील मुलांना सरकारी नियमानुसार गाडी चालवायला बंदी आहे. आणि या व्यक्तीने तर अगदी व्यवस्थित चालायलाही येत नसलेल्या चिमुकल्याचा हातात बाईक दिली आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: घरात लॉकर नव्हता तेव्हा सोनं कुठे ठेवलं जायचं? पूर्वी लोकं काय करायचे एकदा पाहाच
ही घटना एका व्यक्तीने आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद करून ती सोशल मीडियावर शेअर केली; जी पाहताच पोलीसही चक्रावले आणि वाहनमालकावर तत्काळ कारवाई केली. हा व्हिडीओ @viral_noon’ या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्यावर युजर्स विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहेत.