जग आता एकटे राहण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. आज कोणाशी ट्युनिंग जमलं नाही तर लोक दुसऱ्या मिनिटाला टाटा-बाय करतात. पण प्रत्येक नात्यात फिक्सिंग खूप महत्त्वाचं असतं. कोणी चुकत असेल तर तुम्ही त्याला दुरुस्त करा, त्यालाही बरोबर व्हायचं असतं. परंतू हल्ली लोकांना एकटं राहण्यात जास्त आनंद वाटतो. प्रत्येकाला वैयक्तीक आयुष्य असतं आणि तेही आवश्यक आहे, असं म्हणणाऱ्या लोकांच्या डोळ्यात या व्हायरल व्हिडीओनं झणझणीत अंजन घातलंय. पाहा हा व्हायरल व्हिडीओ…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कुटुंब हे नात्यांच्या बंधाचं उत्तम उदाहरण आहे. घरातल्या एका सदस्याचा चेहरा जरी पडलेला दिसला तरी संपूर्ण घर त्याच्या काळजीत पडतं. कारण कुटुंब माणसाला आधार देतं. पेंग्विनच्या कळपाचा हा एक व्हिडीओ सुद्धा अगदी तसाच आहे. हे पाहून तुम्हाला तुमच्या कुटूंबाची आठवण येईल. आपण कसे दुःखी होतो, ब्रेकअप होतो, अशा प्रत्येक दुःखाच्या क्षणी आपलं कुटुंबच आपल्याला धीर देतं, आणि मग आपण त्याच जोशाने कामाल लागतो आणि यश मिळवतो.

आणखी वाचा : मुलाने मोबाइल गिफ्ट केल्यानंतर आईचा आनंद अनावर; व्हिडीओ पाहून तुमचंही मन भरुन येईल

या व्हिडीओमध्ये सर्व पेंग्विन बर्फावर एकत्र धावताना दिसत आहेत. पण एकटाच पेंग्विन पुढे जाताना दिसत आहे. तो कुटुंबापासून दूर गेलेला असतो. एकट्या पेंग्निनला जाताना पाहून दुसरा पेंग्विनही त्याच्या मागे मागेर जात त्याला फॉलो करतो. पण त्या दोघांना एकत्र भेटता येत नाही. यानंतर बर्फाचा भाग बाकीच्या भागापासून वेगळा होतो, ज्यामध्ये तो एकटा पेंग्विन चालतो. आता घरातील बाकीचे सदस्य त्याच्याकडे बघत असतात. कदाचित ते त्यांच्याच भाषेत प्रोत्साहनही देत ​​असतील. ते सगळे मागे वळून त्याच्याकडे बघतात. तो धावतो कारण आता जर तो धावला नाही तर तो समुद्रात पडेल किंवा या बर्फात वाहून जाईल.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : डान्स करता करता स्टेजवरच भांडू लागल्या मुली, जो सोडवायला आला त्याला सुद्धा धू धू धुतलं!

अगदी काठावरून तो दुसऱ्या बाजूला येतो आणि त्याचा जीव वाचतो. मग तो आपल्या कुटुंबाकडे धावत येतो आणि शाहरुखसारखा त्यांना भेटतो. हा पेंग्निन कधी आनंदी तर कधी दुःखी असतो. ही गोष्ट आहे कुटुंबाची. या व्हिडीओमध्ये तुम्हाला सुख, दु:ख आणि हॅपी एंडिंग सुद्धा दिसेल. हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडला आहे. एकदा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो पुन्हा पाहण्याचा मोह लोकांना आवरता येत नाही.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : समोर आवडते पदार्थ ठेवले होते…पण एका चुकीमुळे जे घडलं ते पाहून तुम्ही पोट धरून हसाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : “तू मोठा होऊन काय बनशील?” या प्रश्नावर मुलाने जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्ही पोट धरून हसाल, एकदा पाहाच

सोशल मीडियावर या व्हिडीओने धुमाकूळ घातलाय. या व्हिडीओला आतापर्यंत एक कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ‘@outdoor_bass’ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ७६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केलंय. केवळ ३३ सेकंदाच्या या व्हिडीओने लोकांना कुटुंबाचा महत्त्व समजून सांगितलंय. हा व्हिडीओ पाहून जे लोक एकटे राहत आहेत त्यांना आपल्या कुटुंबाची आठवण करून देत आहे.