कधी कधी एखादे पदार्थ किंवा पेय दुकानातून घेतल्यानंतर कळत नकळत त्याचे रॅपर आणि रिकाम्या बाटल्या कचऱ्याच्या डब्ब्यातच फेकून देतो. पण याचा त्रास प्राण्यांना होत असून कधी कधी ते संकटात देखील सापडतात. जमिनीवरील प्रदूषण सजीवांना विविध प्रकारे हानी पोहोचवू शकते. विषारी कचरा आणि दूषित पदार्थ हे मानव आणि प्राण्यांसाठी धोकादायक ठरू शकतात, ज्यामुळे रोग होऊन आरोग्यावर दीर्घकालीन परिणाम होतात. याबाबत मानवाला इशारा देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये कचऱ्यात असलेल्या एका बिअर कॅनमनध्ये तब्बल चार फुटाचा कोब्रा अडकून पडल्याची घटना घडली होती. परंतू सर्पमित्रांच्या अथक परिश्रमानंतर या कोब्राला बिअर कॅनमधून सुखरूप बाहेर काढण्यात आलं. याचा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, एका झाडाझुडपाच्या परिसरात चार फुट लांबीच्या कोब्रा जातीच्या सापाचं डोकं एका बिअर कॅनमध्ये अडकलं आहे. हा कोब्रा जातीचा साप बिअर कॅनमध्ये अडकलेलं डोकं बाहेर काढण्यासाठी धडपडत आहे. पण बराच वेळ प्रयत्न करूनही हा कोब्रा आपलं डोकं बिअर कॅनमधून बाहेर काढण्यात यशस्वी ठरतो. अथक प्रयत्न केल्यानंतर डोकं बाहेर काढता येत नसल्याने हा कोब्रा अक्षरशः दमुन जातो. हे चित्र दिसल्यानंतर स्थानिक गावकऱ्यांनी याबाबत सर्पमित्राला माहिती दिली.

सर्पमित्र घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्या सापाचं डोकं बिअर कॅनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. सुरूवातीला बिअर कॅनमधून सापाला श्वास घेता यावा यासाठी त्या बिअर कॅनला कटरच्या मदतीने कापून सापाचं डोकं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो. खरं तर या प्रयत्नात सापाच्या आणि सोबतच सर्पमित्राच्या जीवाला धोका होता. बिअर कॅन कापत असताना अचानक या सापाने फणा काढून त्याला दंश केला असता. परंतू या सर्पमित्राने आपला जीव धोक्यात घालून सापाचं डोकं बिअर कॅनमधून बाहेर काढलं. सापाचं डोकं बाहेर काढताच हा कोब्रा साप आक्रमक होताना दिसून आला. परंतू अजुनही हा कोब्रा साप बिअर कॅनमध्ये अडकलेलाच होता. त्याला पूर्णपणे बाहेर काढताना कोब्रा दंश करू शकतो, अशी शक्यता लक्षात घेत त्याचं डोकं एका प्लास्टिक ट्यूबमध्ये घालून मग त्याचं संपूर्ण शरीर बिअर कॅनमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे बिअर कॅनमधून पूर्णपणे फाडून या सापाला सुरक्षित बाहेर काढण्यात आलं.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सुंदर एअर होस्टेसने विमानतळावरच केला डान्स; Lazy Lad गाण्यावर तिचे स्टेप्स पाहून तुम्ही म्हणाल…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : नवा हात मिळाल्यावर चिमुरड्याचा चेहरा फुलला; VIRAL VIDEO पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल!

केवळ २० मिनीटात या सर्पमित्राने कोब्राला बिअर कॅनमधून बाहेर काढलं. त्यानंतर त्याला जखमांवर उपचार करण्यात आले आणि नंतर पुन्हा जंगलात सोडण्यात आले. हा व्हिडीओ ओडिशातील पुरी या गावचा असल्याचं कळतंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरलाय. OTV ने त्यांच्या यूट्यूब चॅनलवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ २ डिसेंबर रोजी शेअर करण्यात आला होता. आतापर्यंत या व्हिडीओला ९३ हजार व्ह्यूज मिळाले आहेत.

आणखी वाचा : लग्नाआधी मित्राने नवरीला विचारलं, “तुला कसं वाटतंय?” मिळालं हे उत्तर, पाहा VIRAL VIDEO

या व्हिडीओ पाहून पाहणाऱ्यांच्या अंगावर शहारे येतात. बिअर कॅन कापत असताना आतल्या सापाला काही इजा तर नाही ना होणार, अशी भीती मनात येते. तसंच तर साप बिअर कॅनमधून बाहेर पडला तर लगेच समोरच्याला दंश तर करणार नाही ना, असा विचार मनात येतो. परंतू सर्पमित्राने मोठ्या हुशारीने या सापाला बिअर कॅनमधून बाहेर काढलं, याचं कौतुक सोशल मीडियावर करण्यात येतंय.

Story img Loader