Viral Video Today: सोशल मीडियावर एखादं गाणं किंवा गाण्यातील अगदी एक दोन ओळी इतक्या व्हायरल होतात की मग स्क्रोल केल्यावर प्रत्येकवेळी फक्त तोच आवाज आणि त्याच स्टेप दिसून येतात. अनेकदा युजर्स याने वैतागतात पण काही व्हिडीओ इतके सुंदर असतात की गाणं तेच असुदे, स्टेप्स त्याच असुदे पण ते बघण्याचा उत्साह मात्र तुम्हाला व्हिडिओवर खिळवून ठेवतो. असाच काहीसा व्हिडीओ सध्या इंस्टाग्राम व ट्विटरवर तुफान व्हायरल होत आहे. तुम्ही ते भोजपुरी गाणं पतली कमारिया मोर हाय हाय हे गाणं आतापर्यंत खूपदा रील्स मध्ये ऐकलंच असेल तर याच गाण्यावर एका कॉलेजमधल्या चार मुलींनी केलेला डान्स तुफान व्हायरल होत आहे.
या गाण्याच्या कॅची हुक स्टेप्स करताना मुलींच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून नेटकरी पार घायाळ झाले आहेत. @Gulzar_sahab या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओला तब्बल ८७ हजार व्ह्यूज आहेत आणि अन्यही सोशल मीडिया माध्यमांवर हा व्हिडीओ तितकाच गाजतोय. खरं पाहायला गेलं तर स्टेप्समध्ये या तरुणींनी फार काही वेगळेपणा दाखवलेला नाही पण त्यांच्या हावभावाने मात्र त्या नक्कीच भाव खाऊन गेल्या आहेत.
तरुणींच्या सुंदर अदा होतायत व्हायरल
अर्थात या व्हिडिओवर कमेंट्सचा वर्षाव पाहायला मिळत आहे. ८७ हजाराहुन अधिक पाहिलेल्या आया व्हिडिओला हजारो लाईक्स सुद्धा आहेत. अनेकांनी कमेंट करून या तरुणींच्या सौंदर्याचे वाहवा केली आहे. तर काहींनी आमच्या शाळेत असं टॅलेंट का नव्हतं असं म्हणत मजेशीर पद्धतीने दुःख व्यक्त केलं आहे.
हे ही वाचा<< Video: लोकलच्या गर्दीत ‘ती’ बाई हट्ट धरून बसली; रेल्वेचालक खाली उतरला अन म्हणाला, “आधी चल.. “
दरम्यान या गाण्याची क्रेझसध्या इतकी आहे की, अलीकडेच एका महिला शिक्षिकेने चक्क शाळेच्या वर्गातच विद्यार्थ्यांसोबत या गाण्यावर डान्स केला होता. हे रीळ व्हायरल होताच नेटिझन्सने संताप व्यक्त करत शिक्षिकेच्या निलंबनाची मागणी केली होती.