Viral Animal Video: जंगलाचा राजा तू असशील पण इथला रॉबिनहूड मी आहे, असं म्हणावं असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. असं म्हणतात की एखाद्याला एवढं घाबरवू नये ज्यामुळे त्याची भीतीच संपून जाईल आणि उलट तुम्हालाच घाबरून पळून जायची वेळ येईल. पण कदाचित ही माहिती या व्हायरल व्हिडीओमधील सिंहांना कोणी सांगितलीच नसावी. म्हणूनच मोठ्या रुबाबात हे जंगलातील चार राजे पाण्यात पाणघोड्यावर हल्ला करायला गेले, पण आपणही काही कमी नाही याची प्रचिती देत बलाढ्य हिप्पोने सिंहांना सळो की पळो करून सोडल्याचे दिसतेय. दोन बलवान प्राण्यांमधील ही लढत पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ‘WildLifeAnimal’ वापरकर्त्याने शेअर केला असून सध्या तुफान व्हायरल होत आहे. क्लिपमध्ये, एक सिंह आणि तीन सिंहीणी एका पाणघोड्याला पाण्यात शिरून मारण्याचा प्रयत्न करत होत्या. खरंतर पाण्यात पाणघोड्याचे बछडे सापडतील असे वाटून सिंह शोधकाम करत होते मात्र तितक्यात एक भलामोठा पाणघोडा पाण्यातून समोर येतो आणि सिंहावर पलटवार करतो. पाणघोड्याचा वेग व शक्ती पाहता जीव वाचवण्यासाटी सिंह पुन्हा जमिनीच्या दिशेने सैरावैरा पळू लागतात.

(Video: १४ सिंहिणींचा एका हत्तीवर हल्ला; बुद्धिमान गजराजांनी असं काही केलं की बघून तुम्हीही म्हणाल वाह्ह)

सिंह व पाणघोड्याची लढाई

तुम्हाला माहित आहे का?

एका प्रौढ पाणघोड्याची शक्ती प्रति चौरस इंच २००० पौंड असते. तर दुसरीकडे एका सिंह किंवा वाघाची शक्ती १००० पौंड प्रति चौरस इंच असते. फार कमी प्राणी पाणघोड्यावर हल्ला करण्याचे धाडस करतात कारण एक पाणघोडा एकाच चाव्यात बहुतांश प्राण्यांना फाडून टाकू शकतो. सिंहाशी लढाईत तर एक पाणघोडा शक्तीने आणि आकाराने कधीही जिंकू शकतो. पण या व्हायरल व्हिडीओचे वैशिष्ट्य असे की एक नव्हे चक्क चार सिंह हल्ला करायला गेले असतानाही पाणघोड्याने त्यांना पळवून लावले.