लहान मुलांना शिस्त शिकवता शिकवता पालकांची डोकेदुखी होऊन जाते. जिथे हल्लीच्या लहान मुलांचे इतके लाड होतात की, त्यांना शिस्त आणि या मुलांचा अगदी दूरदूरचा संबंध येतो. अशा तक्रारी अनेक ठिकाणी पहायला मिळत असतानाच एक व्हिडीओ सर्वांना आश्चर्यचकित करून सोडतो आहे. या व्हिडीओमध्ये दिसणारा लहान मुलगा सकाळी ६ वाजता उठून स्वतःची कामे स्वतः करतो. इतकंच काय तर तो स्वयंपाक सुद्धा करतो आणि शाळेत जाण्यापूर्वी घरातली सर्व कामे करतो आणि मगच शाळेत जातो. हे ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही, त्यासाठी हा व्हिडीओ एकदा पाहाच.
एरव्ही प्रत्येक घरात सकाळी लहान मुलांना झोपेतून लवकर उठवण्यासाठी त्यांच्या मागे लागावं लागतं. बहुतेक मुले जेव्हा किशोरवयात येतात तेव्हा त्यांनी घरगुती कामात मदत करण्याची अपेक्षा केली जाते. पण या व्हायरल व्हिडीओमधला हा अवघ्या सहा वर्षांचा मुलगा दररोज सकाळी ६ वाजता स्वतःहून उठतो, स्वतःसाठी स्वयंपाक करतो आणि शाळेत जाण्यापूर्वी घरातील अनेक कामे करतो. हे पाहून सोशल मीडियावरील सर्व नेटिझन्सना आश्चर्याचा मोठा धक्का बसला आहे. हल्लीची मुलं तर कायम मोबाईल, टॅब, लॅपटॉप, संगणकामध्ये गुंतलेले आपण पाहत असतो. अशा मुलांपुढे या सहा वर्षाच्या मुलाने एक आदर्श निर्माण केलाय. अगदी गुड बॉयप्रमाणे हा मुलगा त्याच्या पालकांना घरगुती कामामध्ये हातभार लावतो. हे पाहून सारेच जण या चिमुकल्याचं कौतुक केलंय.
आणखी वाचा : अरे बापरे! सिंहाला कडेवर घेत फिरत होती महिला; VIRAL VIDEO पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ @shopping666 या TikTik अकाउंटवरून शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये सकाळी ६ वाजता एक लहान मुलगा बिछान्यातून उठताना दिसत आहे. तो त्याची इलेक्ट्रिक फायर चालू करतो, त्याचे कपडे काढतो आणि स्वच्छ करतो. छान इस्त्री करतो. आपले दात घासतो आणि चेहरा धुतो. त्यानंतर काही अंडी आणि काही धान्य उकडण्यासाठी तो स्वयंपाकघरात जातो. त्याचा नाश्ता संपल्यानंतर तो त्याची वाटी आणि चहाचा कप धुतो. तो टॉयलेट आणि शॉवर स्वच्छ करण्यासाठी जातो, कपडे धुतो आणि व्हॅक्यूमने त्याचे बेड साफ करतो. वॉशिंग मशिनमध्ये कपडे घालण्यापूर्वी तो लिव्हिंग रूम पुसून काढतो. लहान मुलगा मग त्याच्या आईकडे फूट स्पा आणतो, जी पलंगावर आराम करत आहे. शाळेत जाण्यापूर्वी तो शूज पॉलिश करतो.
आणखी वाचा : पुन्हा वर्क फ्रॉम होम मिळाल्यानंतर ‘मोहब्बतें’ चित्रपटातला हा सीन होतोय VIRAL, एकदा पाहाच…
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : ‘योद्धा जन्माला येत नाही तर…तो घडत असतो!’ भारतीय जवानाचा हा VIRAL VIDEO पाहून तुम्ही सुद्धा हेच म्हणाल!
“माझे बाळ सहा वर्षांचे आहे, आणि तो दररोज सहा वाजता उठून स्वतःसाठी स्वयंपाक करतो, घरकाम करतो आणि नंतर शाळेत जातो,” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय.
सोशल मीडियावर व्हायरल झालेला १ मिनिट २५ सेकंदाचा व्हिडीओ आतापर्यंत २६ मिलियनपेक्षा जास्त लोकांनी पाहिलंय. एवढ्या लहान वयात या मुलाने इतकं काही केल्याचं पाहून नेटिझन्स अवाक् झाले. या व्हिडीओवर लोक मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत आहेत. लोक या चिमुकल्याचं कौतुक करत आहेत. तर काही युजर्सनी टिका देखील केलीय. लहान मुलांना त्यांचं बालपण जगू द्या, इतक्या लहान वयात अशी काम लादून त्यांचं बालपण गमावू नका, असंही काही युजर्सनी म्हटलंय.