Viral Video: सोशल मीडियावर सातत्याने विविध विषयांवरील व्हिडीओ चर्चेत असतात. यातील काही व्हिडीओ मनोरंजन करणारे तर काही व्हिडीओ काळजाचा थरकाप उडवणारे असतात. यातील मोजके व्हिडीओ क्षणार्धात प्रचंड व्हायरल होऊन लाखो व्ह्यूज मिळवतात. सध्या अशाच एक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
वय, परिस्थिती काहीही असो, जगताना आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद लुटता आला पाहिजे. असे खूप कमी लोक असतात जे आयुष्यातील दुःख, वेदना विसरून आनंदाने जगतात. या व्हायरल होणाऱ्या आजीदेखील जवळपास ६० हून अधिक वयाच्या आहेत, तरीही त्यांच्यातील उत्साह एखाद्या तरुणीला लाजवेल असा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक वयाची साठी पार केलेल्या आजी एका लग्न समारंभामध्ये “बाईला माझ्या नाद पाण्याचा”, या गाण्यावर नाचताना दिसत आहेत. त्यांचा हा डान्स पाहून आसपासचे लोकही आश्चर्याने पाहतात. त्यांचा हा डान्स खूप व्हायरल होत आहे.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्सवरील @yogitababar91gmail.com9 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत सहा लाखाहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “आयुष्यात स्वतः मध्ये आनंदी असणं खूप गरजेचं आहे हे ह्या मावशींकडे बघून वाटलं आज”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “आयुष्यात माणसाने लाज सोडली तर प्रत्येक गोष्ट आनंदाने जगू शकतो”, तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “लयभारी गावाकडची मज्जाच वेगळी”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “मस्त आहेत आजी.”