एखादा चोर पळतो, त्याला पकडण्यासाठी त्याच्यामागून काही लोक पळतात आणि मध्येच हिरोची एंट्री होते, तो एका फटक्यात चोराला पकडतो. बऱ्याच फिल्ममध्ये आपण असे फिल्म पाहिले असतील. पण फिल्मी हिरोप्रमाणे चोराला पकडणाऱ्या एका रिअल मर्दानीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अगदी सिनेमात दाखवतात तसं या ७३ वर्षीय आजीने दुकानातून चोरी करणाऱ्या एका चोरट्याला एकटीने पकडलंय. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ कॅनडातील ब्रिटीश कोलंबियामधल्या कॅम्पबेल रिव्हरच्या वॉलमार्टमधला आहे. एका ७३ वर्षीय आजीने मोठ्या हिंमतीने या चोराला एकटीने पकडल्यानंतर सोशल मीडियावर तिचं भरपूर कौतुक करत आहे. ही घटना २९ जानेवारीची आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एक माणूस काळ्या रंगाचा कोट आणि हुडी परिधान करत दुकानात शिरताना दिसून येतोय. त्याची एकूण हालचाल पाहता तो चोर असावा, अशी शंका मनात सुरूवातीपासूनच येऊ लागते. कार्टमध्ये किराणा सामान भरून तो दुकानात फिरताना दिसून येतोय. तिथेच एक ७३ वर्षीय आजी सुद्धा किराणा सामान घेण्यासाठी आल्या होत्या.
वॉलमार्टमध्ये हा संशयास्पद व्यक्ती फिरताना पाहून या ७३ वर्षीय आजीने तिथल्या कर्मचाऱ्यांना या व्यक्तीबाबत माहिती दिली होती. हा व्यक्ती कार्टमध्ये भरमसाठ किराणा सामान भरून दुकानाबाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. आणखी एक व्यक्ती त्याला “तुम्ही त्यासाठी पैसे देणार आहात का?” असं विचारताना दिसत आहे. त्या व्यक्तीला हा चोरटा मोठ्या आत्मविश्वासात होकार सुद्धा देतो. त्यानंतर तो कार्टसोबत दुकानाबाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतो. इतक्यात या ७३ वर्षीय आजीने या चोराला दारावरच अडवलं.
आणखी वाचा : अरारारा खतरनाक ड्रायव्हिंग! पठ्ठ्याने तर कमालच केली; VIRAL VIDEO पाहून भलेभले पडले गार
चेहऱ्यावर सुद्धा काळा कपडा लावून किराणा माल घेऊन जाणारा हा व्यक्ती पाहून या चोराला दारावर अडवल्यानंतर आजीने त्याला चेहऱ्यावरचा कपडा हटवण्यासाठी सांगितलं. आपली चोरी पकडली जाणार या भीतीने हा चोटरा तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. हा चोरटा आजीला ढकलून पळून जाण्याच्या प्रयत्न करत असतानाच आजीने मोठ्या हुशारीने या चोराला पकडून ठेवलं. या चोराने एका हाताने कार्ट पडकलं होतं आणि दुसऱ्या हाताने सायकल पकडली होती. त्यामुळे त्याला त्याच्याकडचं शस्त्र काढण्यासाठी संधीच मिळाली नाही.
आणखी वाचा : फुल टाईम जॉब करणारी ही बेघर महिला कारमध्येच राहते, जिममध्ये अंघोळ करते, पाहा हा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : टांझानियातील ‘त्या तरूणाची गोविंदा स्टाईलमध्ये डायलॉगबाजी, पाहा हा VIRAL VIDEO
याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होऊ लागलाय. Tr00peRR नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत १.१ मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ पाहून लोक सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. प्रत्येकजण हा व्हिडीओ पाहून आजीच्या धैर्याचं कौतुक करत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये असं लिहिलं की, “आता मला हेच पाहायला आवडते, यातील बहुतेक लोक चोरी करतात कारण त्यांना कोणीही पकडत नाही. ती म्हातारी उत्कृष्ट नागरिक आहे.” दुसर्या एका युजरने लिहिले की, “देव या आजीला आशीर्वाद देवो. ती बहुतेक तरुणांपेक्षा खूप धाडसी आहे.”