सोशल मीडिया अनेक प्रेरणादायी व्हिडीओंनी भरलेला आहे. एखादी गोष्ट मनाशी पक्की केली, ठरवली की, कोणतीचं गोष्ट अवघड नसते. असाच प्रत्यय देणाऱ्या एका ७७ वर्षीय आजोबाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. वय हा फक्त आकडा आहे आणि आपले छंद जोपासण्यासाठी कधीच वय आड येत नाही, हेच सिद्ध करणारे हे आजोबा सध्या सोशल मीडिया चर्चेचा विषय ठरत आहेत. याहूनही विशेष बाब म्हणजे हे आजोबा प्रोस्टेट कर्करोगाच्या चौथ्या स्टेजशी लढा देत आहेत. पण अशा परिस्थितीतही त्यांनी हार न मानता आपले छंद जोपासत आहेत. छंद जोपासण्याचा विषय आला की आता वय झालंय आमचं असं म्हणणाऱ्यांनी हा व्हिडीओ एकदा नक्की पाहाच.

Own Trail च्या सीईओ रिबेका बास्टियन यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. या व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या आजोबांची ती मुलगी आहे. ७७ वर्षीय आजोबा हे आपल्या ट्रेनरसोबत आईस स्केटिंग करताना दिसून येत आहेत. आईस स्केटिंग करता करता हे आजोबा जबरदस्त डान्स सुद्धा करतात. खरं तर या व्हिडीओमधील आजोबांचा उत्साह आणि उर्जा पाहून कोणीच म्हणणार नाही की, हे आजोबा प्रोस्टेट कर्करोगाच्या चौथ्या स्टेजविरोधात लढाई देत आहेत. स्केटिंग करता करता आजोबांच्यासमोर त्यांची ट्रेनरसुद्धा फिकी पडते. पण हे आजोबा या ट्रेनरला पुन्हा परफॉर्म करण्यासाठी प्रोत्साहित करतात आणि पुन्हा त्याच जोशात ट्रेनरसोबत सुंदर डान्स परफॉर्म करतात. हा व्हिडीओमध्ये बॅकग्राऊंडला सुरू असलेल्या संगीतासोबत हा व्हिडीओ पाहताना अनेक जण भावूक देखील होत आहेत.

हा व्हिडीओ शेअर करताना मुलगी रिबेका बास्टियन यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “माझे वडील ७७ वर्षांचे आहेत आणि त्यांना चौथ्या स्टेजचा प्रोस्टेट कर्करोग आहे. त्यांनी काही वर्षांपूर्वी आईस स्केटिंग शिकायचं ठरवलं आणि त्यांची आवड न जोपासत नुकतंच त्यांनी त्यांच्या ट्रेनरसोबत परफॉर्म केलं. ज्याला वाटतं की काहीतरी नवीन करून करण्यासाठी उशीर झाला आहे…त्यांनी यातून प्रेरणा घेण्यासारखं आहे.” यापुढे बोलताना तिने आणखी सांगितलं की, तिच्या वडिलांना २०२० मध्ये चौथ्या स्टेजच्या प्रोस्टेट कर्करोगाचं निदान झालं होतं आणि ते गेल्या अडीच वर्षांपासून क्रॉनिक लिम्फॅटिक ल्यूकेमिया (सीएलएल)शी झुंज देत आहेत.

आणखी वाचा : कॉपी करण्याच्या नादात थेट चिखलाच्या डबक्यात कोसळली मुलगी..; VIRAL VIDEO पाहून पोट धरून हसाल

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : पाकिस्तानी तरुणीचा भाजी बनवतानाचा नवा VIRAL VIDEO, लोक म्हणाले, “तुम्ही फक्त व्हिडीओसाठी काम करता का?”

आपल्याला साधं अंगाला खरचटलं तरी आपण हात पाय पकडून एका कोपऱ्यात पडून बसतो. विशेष म्हणजे सत्तरी पार केली की लोक अंथरूणाला खिळून बसतात. पण याच वयात तेही प्रोस्टेट कर्करोगाच्या चौथ्या स्टेजला असताना सुद्धा आजोबांनी अंथरूणात न पडता जीवन जगण्याचा आनंद लुटण्याचा निर्णय घेतलाय, हे पाहून जीवनाकडे पाहण्याचा सर्वांचा दृष्टीकोण बदलून जातो. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

आणखी वाचा : VIRAL : झोपलेल्या गर्लफ्रेंडच्या पापण्या उघडल्या आणि फोन अनलॉक करून १८ लाखांचा चूना लावला

हा व्हिडीओ नेटकऱ्यांना इतका आवडला की, आतापर्यंत या व्हिडीओला २.६ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. तर १ लाख ४४ हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक करत आजोबांचं कौतुक करताना दिसून येत आहेत. या व्हिडीओखाली कमेंट्स सेक्शनमध्ये लोक आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करत आजोबांच्या इच्छशक्तीचं कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा सकारात्मक व्हाल, हे मात्र नक्की.

Story img Loader