Viral Video: महाराष्ट्राला आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लाभला आहे. येथील गड-किल्ले महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहे. महाराजांना मानवंदना देण्यासाठी हजारो शिवप्रेमी त्यांच्या गड-किल्ल्यांना भेट देत असतात आणि तेथील व्हिडीओ, फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करतात. सोशल मीडियावर तुम्ही आजवर गड-किल्ल्यांचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, ज्यात कधी कोणी गड-किल्ल्यावर शिवगर्जना म्हणताना दिसतं, तर कोणी भजन गीत गाताना दिसतं, तर कधी लहान लहान ३-४ वर्षांची मुलंही किल्ला चढताना दिसतात. दरम्यान, आताही असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक ८६ वर्षाचे आजोबा न थकता किल्ला चढताना दिसत आहेत.
कोणताही गड चढायचा म्हटला की, अनेकांना घाम फुटतो. विशी-पंचविशीतले तरुणही १० वेळा धाप लागते. पाय दुखतात, थाप लागते, ऊन सहन होत नाही म्हणून हल्लीचे अनेक जण गड-किल्ला चढणं टाळतात. पण, आपल्या आधीची पिढी अशी नव्हती. हल्ली ६०-७० वय ओलांडलेल्या खेड्यातील एखाद्या आजोबांचा आणि आताच्या ३० वर्षांच्या तरुणाचा उत्साह सारखाच पाहायला मिळतो. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच पाहायला मिळत आहे.
या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे. त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, रायरेश्वर किल्ला चढण्यासाठी गेलेले आजोबा अजिबात न थकता, किल्ला चढत आहेत. यावेळी ते किल्ल्यावर जाण्यासाठी बांधण्यात आलेल्या लोखंडी जिन्यावरून वर जात आहेत. आजोबांचा हा उत्साह पाहून बाजूने जाणारा एक तरुण त्यांना आजोबांचे वय विचारतो, “आजोबा ८६ असं उत्तर देतात”. त्यावर तो तरुण आजोबांना म्हणतो, “जेव्हा मी ८६ वर्षांचा होईन तेव्हा मी चढेन का हा किल्ला? मी आताच थकलोय?”, त्यानंतर आजोबा म्हणतात, “मी शंभर शंभर बैठका काढायचो, पन्नास जोर काढायचो”, आजोबांचा हा व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rajdhani__satara007 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, तसेच या व्हिडीओवर आतापर्यंत चार लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.
पाहा व्हिडीओ:
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ इथेच घेतली रायरेश्वराच्या साक्षीने”. दुसऱ्या युजरने लिहिलेय, “बाबा, मानलं तुम्हाला.. नाद खुळा जय शिवराय”. आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “महाराजांच्या प्रेरणेचं बळ आहे हे”. आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “बाबा खूपच खतरनाक आहेत”. तसेच अनेक युजर्स किली पॉलचे कौतुक करताना दिसत आहेत.