Viral video: वयस्कर व्यक्ती म्हटलं की त्यांच्याबाबत एक छबी आपल्या मनात तयार झालेली असते. या वयात काही शारीरिक आणि आरोग्याच्या तक्रारीही असतात त्यामुळे तरुणांप्रमाणे वयस्कर व्यक्तींना सर्वच जमतं असं नाही. पण सध्या सोशल मीडियावर अशी आजीबाई व्हायरल होतो आहे, जिने असं काही करून दाखवलं आहे, ज्यामुळे तुम्हीही शॉक व्हाल. आजकाल पोहणं, खेळण-बागडणं असं म्हटलं की तरुणाईमध्ये कमालीचा उत्साह दिसतो. मात्र आता समोर आलेला व्हिडीओ पाहून तुम्ही तोंडात बोटं घालाल. हो कारण व्हिडीओमध्ये आजी ज्या प्रमाणे पोहत आहेत ते पाहून अनेकांना आपल्या डोळ्यांवर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, साधं लुगडं नेसून एक आजी तळ्याच्या काठाशी उभ्या आहेत, डोक्यावर पदर जागच्या जागी अडून बसलाय, मागून कुणीतरी त्यांना आई मारणार का उडी असं काहीसं म्हणत विचारतं आणि चक्क या आजी नितळ पाण्यात सूर मारतात. हात पाय मारत आपली पापणी लवण्याच्या आधीच या आजीबाई तळ्याच्या मध्यापर्यंत पोहोचतात. व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या तळ्याचं पाणी इतकं नितळ आहे की वरून पाहताना तळं बऱ्यापैकी खोल असणार हा अंदाज येतो.

Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mother love shocking video woman Went To Buy Milk for her baby And The Train Started Emotional Video
भुकेल्या बाळाला दुध आणायला उतरली आणि ट्रेन सुटली; पण तेवढ्यात घडला चमत्कार, VIDEO चा शेवट पाहून डोळ्यांत येईल पाणी
an old lady enjoying Ropeway by wearing nauwari
आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे! नऊवारीत मराठमोळ्या आज्जीने घेतला रोप वे चा आनंद; व्हिडीओ होतोय व्हायरल
Maharashtra need Chhatrapati Shivaji Maharaj
Video : महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे! तरुणीने कवितेतून सांगितले दु:ख; म्हणाली, “शिवराज्याचे फक्त धडे वाचले आम्ही…”
funny ukhana
“पुढच्या जन्मी मुकेश अंबानीच हवा”; काकूंचा उखाणा ऐकून काकांनी दोन्ही हात वर केले, पाहा मजेशीर Video
tourists get stuck in frozen lake in Arunachal Pradesh
गोठलेल्या तलावावर चालताना अचानक बर्फ तुटला अन् पर्यटक अडकले, धक्कादायक VIDEO होतोय व्हायरल
Vinod Kambli discahrge from hospital
Vinod Kambli video: “तरुणांनो आयुष्य आनंदात घालवा, पण दारू….”, रुग्णालयातून स्वतःच्या पायावर बाहेर आलेल्या विनोद कांबळीचा संदेश

“काळ्या काळ्या मातीत झुलणाऱ्या शेतात बहरून आले जणू”

या व्हिडीओ “काळ्या काळ्या मातीत झुलणाऱ्या शेतात बहरून आले जणू” हे जुनं गाणं लावलं आहे, त्यामुळे आजीचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना जुनी माणसं, जुने दिवस आठवले. आजीचा उत्साह हा तरुणाईला लाजवेल असा आहे. उत्साहाला कशाचेच बंधन नसते, अगदी वयाचेही नाही; याचाच प्रत्यय सध्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओतून येत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> अरे रे! फुकट तिथे प्रकट; तळीरामांनी पोलिसांसमोरच दारूवर मारला डल्ला, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ नेमका कुठला आहे, याबाबात माहिती मिळू शकलेली नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर marathi_reels_90 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला असून तो आता तुफान व्हायरल होत आहे. लोक या व्हिडीओला आवडीने पाहत असून लाईक आणि शेअर करत आहेत. आतापर्यंत या व्हिडीओला एकूण लाखो नेटकऱ्यांनी पाहिले आहे. तर अनेकांनी या वयातही अशा प्रकारे हिमंत केल्यामुळे आम्हाला आजीच्या एनर्जीचं कौतुक वाटत असल्याचं म्हटलं आहे. एका युजरने म्हंटलंय,“आजी जोमात” अशी कमेंट केली आहे. आता तुम्हाला या आजींच्या टॅलेंटविषयी काय म्हणायचंय कमेंट करून नक्की कळवा.

Story img Loader