सध्या सोशल मीडियावर एक जबरदस्त व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक गोंडस चिमुकली तिच्या वडिलांसोबत भन्नाट डान्स करताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडला आहे की हजारो लोकांनी तो रिट्विट आणि शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये निष्पाप मुलीचा वडिलांसोबत केलेला हा मनमोहक डान्स सर्वांनाच वेड लावत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ ५ फेब्रुवारीला ट्विटरवर पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडीओ पाकिस्तानातील एका वैद्यकीय विद्यार्थ्याने पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना त्याने लिहिले आहे की, “पहाटे तीन वाजताचा हा व्हिडीओ पाहून मी थक्क झाले आहे.”
हा व्हिडीओ पाकिस्तानच्या मनाल एजाज नावाच्या मुलीने शेअर केला आहे, जी एक वैद्यकीय विद्यार्थी आणि डिजिटल मार्केटर म्हणून काम करते. मनाल ही सोशल मीडियावर सतत सक्रिय असते आणि हजारो लोक तिच्या पोस्ट लाइक करतात. मनाल एजाजही स्वत:ला फूड लव्हर म्हणून सांगत आहे.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : मृत्यूच्या अगदी जवळ पोहोचला होता, पण असा काही चमत्कार घडला की पाहून तुम्हीही व्हाल हैराण!
हा व्हिडीओ अल्ट्रा मॉडर्न बाथरूममध्ये शूट करण्यात आला आहे. तिथे एक हे बाप-लेक आरशासमोर उभे आहेत. यातली चिमुकली हे बाथरूममधील प्लॅटफॉर्मवर उभी आहे आणि त्यामुळे त्या दोघांची उंची समान झाली आहे. यानंतर, बॅकग्राऊंडला एक म्यूझिक ऐकू येत आहे आणि त्या म्यूझिकवर हे दोघे ताल धरू लागतात. या व्हिडीओमधली चिमुकली सर्वांच लक्ष वेधून घेतेय.
या चिमुकलीच्या निरागसतेला पाहून सारेच जण या मुलीच्या प्रेमात पडले आहेत. या व्हिडीओमधील बाप लेक आरशाकडे तोंड करून नाचत आहेत. म्यूझिक कोणत्या भाषेत आहे हे समजत नसले तरी ते ऐकायला उत्तम आहे. बहुधा ही म्यूझिक आखाती देशांतील असावे, असा अंदाज येत आहे. डान्स करताना या बाप-लेकीची जोडी खूपच सुंदर दिसून येत आहे.
आणखी वाचा : असा अनोखा अपघात तुम्ही कधीच पाहिला नसेल, पाहा हा VIRAL VIDEO
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : खतरनाक सापाला वनविभागाच्या महिला अधिकाऱ्याने काही सेकंदात केलं कंट्रोल, पाहा हा VIRAL VIDEO
हा व्हिडीओ फक्त ३० सेकंदांचा आहे, पण इतक्या कमी वेळात मुलीने असा जबरदस्त डान्स केला आहे की बघून तुम्हीही थक्क व्हाल. मुलगी पूर्णपणे डान्समध्ये रमलेली दिसून येत आहे. तिचे हावभाव इतके जीवंत आहेत की प्रत्येकाला या चिमुकलीला आपल्या मिठीत घेण्याची इच्छा होईल. खरोखर हा व्हिडीओ अप्रतिम आणि अविस्मरणीय आहे. हा व्हिडीओ पाहून असं दिसत आहे की, हे दोघेही इराक, सीरिया, जॉर्डन, लेबनॉन यापैकी कोणत्याही देशातील असू शकतात.