Viral Video: समाजमाध्यमांमुळे नेहमीच विविध गोष्टी आपल्या नजरेस पडतात; ज्यात अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. त्यामध्ये कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. तर, काही प्राणी एकमेकांशी भांडताना दिसतात किंवा एकमेकांसोबत खेळताना दिसतात. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हीदेखील काही क्षण चकित व्हाल.
मूर्ती लहान; पण कीर्ती महान ही म्हण तुम्ही ऐकलीच असेल. त्या म्हणीच्या अर्थाप्रमाणेच काही लोक दिसायला लहान असतात; पण त्यांचे कर्तृत्व खूप मोठे असते. ही म्हण अनेकदा आपण काही व्यक्तींना उद्देशून म्हणतो. पण, सध्या व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिल्यावर ही म्हण या व्हिडीओतील प्राण्यासाठीही लागू होत असल्याचे तुमच्या लक्षात येईल. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत असून, अनेक जण त्यावर विविध कमेंट्स करताना दिसत आहेत.
हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातल्या गवताळ प्रदेशातील असून, त्यात विविध प्राणी फिरताना दिसत आहेत. यावेळी अचानक गेंड्याचे एक लहान पिल्लू धावत धावत एका वाइल्डबीस्ट प्राण्याला विनाकारण खुन्नस दाखवते. गेंड्याच्या पिल्लाची ती खुन्नस पाहून वाइल्डबीस्टदेखील काही क्षण चवताळून पुढे येतो. त्यावेळी ते पिल्लूदेखील त्याला आणखी खुन्नस देते. त्यानंतर गेंड्याचे पिल्लू वाइल्टबीस्टच्या अंगावर धावून जाण्याचे नाटक करते तेव्हा तो प्राणी घाबरून मागे पळतो. वाइल्टबीस्ट घाबरलेला पाहून गेंड्याचे पिल्लू पुन्हा त्याच्यावर धावून जाण्याचे नाटक करते तेव्हा वाइल्टबीस्ट दूर पळून जातो. वाइल्टबीस्ट आपल्याला घाबरलेला आहे हे कळताच गेंड्याचे पिल्लू मागे फिरते आणि त्याच्या आईकडे जाते. गेंड्याच्या पिल्लाचा हा खोडकरपणा पाहून नेटकरीदेखील चकित झाले आहेत.
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये, “एक लहान गेंडा खेळकरपणे आईकडे जाण्यापूर्वी वाइल्डबीस्टला त्रास देत आहे.” या व्हिडीओला आतापर्यंत पन्नास लाखांहून अधिक व्ह्युज आणि ३५ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्यावर युजर्सदेखील अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावरील @Nature is Amazing या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
© IE Online Media Services (P) Ltd