Viral Video: हल्ली सोशल मीडियावर कधी कोणतं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रिल्स बनवण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे तेव्हापासून सतत विविध भाषांतील विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. इतकेच नाही तर ही गाणी अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमांमध्येही लावली जातात. नुकत्याच काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गुलाबी साडी या मराठमोळ्या गाण्यानेही सोशल मीडियावर अनेकांना वेड लावले आहे. या गाण्यावर लाखो लोक रिल्स बनवून सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. अनेक प्रसिद्ध कलाकारांनीही या गाण्यावर रिल्स तयार केल्या आहेत. अशातच आता या गाण्यावर डान्सचा नवा व्हिडीओ समोर आला आहे; जो पाहून प्रत्येक जण या डान्सचं कौतुक करताना दिसत आहे.

आतापर्यंत गुलाबी साडी या गाण्यावर सामान्य लोकांनीच नाही तर मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकार, बॉलीवूड तसेच परदेशातील अनेक प्रसिद्ध कलाकारंनीही डान्स केलेला आपण पाहिला आहे. शिवाय या गाण्याचे गुजराती, हिंदी यांसारख्या अनेक भाषेतील वर्जनदेखील समोर आले आहे. या गाण्यावरील नवनवीन रिल्स दररोज आपल्या समोर येतात. ज्यात महिला, लहान मुलं, वृद्धदेखील दिसतात. आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये काही पुरुष मंडळी आहेत, ज्यांनी या गाण्यावर ठेका धरला आहे.

pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
uncle aunty amazing dance on tauba tauba song
तौबा तौबा! काका काकूंनी केला जबरदस्त डान्स; Viral Video एकदा पाहाच
Video of couple kissing metro station platform
मेट्रो स्टेशनवर ‘किस’ करणाऱ्या जोडप्याचा ‘तो’ Video Viral; नेटकरी म्हणे, “यात गैर काय”
Dance Viral Video
‘तुमसे जो देखते ही प्यार हुआ…’, गाण्यावर चिमुकलीने केला असा डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक
kumar vishwas sonakshi sinha ramayana
“तुमच्या घरातील ‘श्री लक्ष्मी’ कोणी…”, कुमार विश्वास यांची सोनाक्षी सिन्हाच्या आंतरधर्मीय लग्नावर टीका; म्हणाले, “मुलांना रामायण…”
Agari Koli womens protest saree giving tradition video viral
“बंद करा, साड्यांचा आहेर बंद करा”, आगरी कोळी समाजातील महिला उतरल्या रस्त्यावर; VIDEO पाहून सांगा तुम्हाला हे पटतं काय

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, मॉर्निंग वॉकसाठी गेलेली पुरुष मंडळी गुलाबी साडी गाण्यावर रील बनवताना दिसत आहेत. यावेळी हे सर्व जण जमेल तसा डान्स करताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभावदेखील खूप सुंदर आहेत. त्यांच्या या व्हिडीओकडे पाहून आयुष्यात जगताना अशा प्रकारचा आनंदही लुटायला हवा, असे कोणालाही वाटेल. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा: गोली बेटा मस्ती नहीं! मांजरीच्या पिल्लाला लाथ मारायला गेला अन्… VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “कर्माचे फळ…”

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @one.sided.lovers_ या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून पाच हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक युजर्सदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “सगळे नाचले, यातच जिंकलं काका..” , तर दुसऱ्याने लिहिलंय की, “आयुष्य सुखी करायचा पासवर्ड”; तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलंय की, “काका खूप मस्त”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “एकच नंबर.”

दरम्यान, यापूर्वीदेखील गुलाबी साडी या गाण्यावर अनेकांनी रिल्स बनवले होते, शिवाय हे तितकेच व्हायरलदेखील झाले होते, ज्यात एका महिलांच्या ग्रुपनेदेखील गुलाबी नऊवारी साडी नेसून मराठमोळ्या पद्धतीने डान्स केला होता.

Story img Loader