Viral Video: समाजमाध्यमांवर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. त्यामध्ये कधी कोणी डान्स, तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतात. त्यावर अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक जण व्हिडीओ रील्स बनवताना दिसतात. काही रील्स पाहून पोट धरून हसायला येतं तर काही रील्स पाहून प्रेरणा मिळते. सध्या अशाच एका चिमुकलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओमध्ये ती चिमुकली गोड हसताना दिसतेय, जे पाहून नेटकरीही तिचं कौतुक करताना दिसतायत.
शाळा म्हटलं की, आपल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड हसू येतं. शाळेतले दिवस कधीही न विसरण्यासारखे असतात. शाळेत केलेला अभ्यास, मजा-मस्ती, भांडणं नेहमीच प्रत्येकाच्या आठवणींत घर करून राहतात. शाळेतल्या गोड गमती-जमती आणि मित्र-मैत्रिणी, शिक्षकांनी शिकवलेल्या कविता, गोष्टी, नेहमीच आपल्या स्मरणात असतात. आताच्या व्हिडीओमध्ये असंच एक गोड संभाषण पाहायला मिळत आहे.
लहान मुलं खूप निरागस असतात. आपण त्यांना जे काही विचारतो, त्यावर ते त्यांच्या निरागस शैलीत उत्तर देतात. जे पाहून आपल्यालाही हसू येतं. आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काही मुली बसल्या असून, एक शिक्षक एका चिमुकलीजवळ येतात आणि यावेळी ती चिमुकली शिक्षकाला म्हणते, “सर, मी मेंदी काढली.” त्यावर सर म्हणतात, “मेंढी काढलीस.” सरांचं हे बोलणं ऐकून वर्गातील इतर मुली आणि ती चिमुकलीही मोठमोठ्यानं हसू लागते. ती बराच वेळ हसते आणि नंतर हातावरची मेंदी दाखवते. त्यावर सर म्हणतात. “अगं, काय म्हणतात त्याला नक्की.” त्यावर चिमुकली “मेंदी मेंदी” असं म्हणते. त्यावर सर तिला विचारतात, “कोणी काढली बेटा, तुझ्या हातावर मेंदी” यावर चिमुकली काहीतरी पुटपुटते. मग सरपण तिच्यासारखा अभिनय करतात. मग ती पुन्हा हसायला सुरुवात करते. चिमुकलीचं हे गोड हसू पाहून नेटकरीही अनेक कमेंट्स करीत आहेत.
पाहा व्हिडीओ:
सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, तो इन्स्टाग्रामवरील @jaykar928 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत चार दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि लाखो लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करीत आहेत.
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “किती गोड निरागस आणि निर्मळ हसते.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “बाळाचे हसणे आणि निरागसता पाहून एक गोड मुका घ्यावासा वाटतोय.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “इंटरनेटवर द्वेषापेक्षा आनंद जास्त पसरू दे! या छोट्या गोड मुलीचं निरागस हसू मन जिंकणारं आहे.”