Viral Video: शाळेमुळे लोक शिक्षित आणि साक्षर होतात. परंतु, जगाच्या शाळेचा अनुभव असणारे; पण कमी शिकलेले लोकही स्वत:च्या सुशिक्षितपणाचा तोरा मिरविणाऱ्या लोकांपेक्षा खूप सुसंस्कृत असल्याचे पाहायला मिळते. अनेकांना त्यांच्या गरीब परिस्थितीमुळे पुरेसे शिक्षण घेता येत नाही. पण, इतर गोष्टींच्या अनुभवांतून ते नकळत अनेक गोष्टी शिकतात. सध्या अशाच परिस्थितीचे दर्शन घडविणारा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. त्यात एक गरीब चिमुकला असं काहीतरी करताना दिसतोय, जे पाहून नेटकरीही त्याचं कौतुक करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

समाजमाध्यमांवर सतत विविध विषयांवरील व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. त्यातील काही व्हिडीओमुळे आपले मनोरंजन होते, तर काही व्हिडीओ आपल्याला नकळत अनेक गोष्टी शिकवून जातात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येही असंच काहीतरी पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका शाळेच्या मैदानावर राष्ट्रगीत सुरू आहे. त्या प्रसंगी मैदानावर कचरा गोळा करण्यासाठी आलेला चिमुकला राष्ट्रगीत ऐकून जागेवरच थांबतो. त्याच वेळी त्याच शाळेच्या मैदानावरून एक व्यक्ती बाईक घेऊन जातो; पण तो मात्र राष्ट्रगीत ऐकायला येत असूनही थांबत नाही. उच्च शिक्षण घेतलेल्या आणि कमी शिकलेल्या दोन व्यक्तींमध्ये राष्ट्रगीताबद्दलच्या आदरामध्ये किती फरक आहे ते या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने, “किती शिकला यापेक्षा काय शिकला हे महत्त्वाचं असतं,” असं लिहिलं आहे.

हेही वाचा: ‘करोडे रूपये दिले तरी ते दिवस परत येणार नाही’ चिमुकल्यांचा किल्ला बनवतानाचा VIDEO पाहून नेटकऱ्यांना आठवलं बालपण

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ ट्विटरवरील @kasa_hais_bhava या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत जवळपास दोन हजारहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स आल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करून चिमुकल्याचं कौतुक करीत आहेत.