Viral Video: समाजमाध्यमांवर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. यावरील ट्रेंड सतत विविध गोष्टींमुळे बदलत असतो. कधी थरकाप उडवणारे व्हिडीओ, तर कधी आपले मनोरंजन करणारे व्हिडीओ सातत्याने आपल्या डोळ्यांसमोर येतात. बऱ्याचदा यावर असे काही व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यात नकळत घडलेल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे, ज्यात एक लहान मुलगा असं काहीतरी करताना दिसतोय जे पाहून तुम्हालाही हसू येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तुम्ही आजपर्यंत अनेक लग्नांमध्ये नवऱ्या मुलाला घोड्यावर बसताना पाहिलं असेल. अनेक ठिकाणी लग्नाच्या दिवशी घोड्याला पाहून नवरदेवाव्यतिरिक्त इतर लहान मुलंदेखील घोड्यावर बसण्यासाठी उत्सुक असतात. घोड्याचा मालक प्रत्येकाला फावल्या वेळात आवडीने घोड्यावर बसवतो. आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओतही एक लहान मुलगा घोड्यावर बसलेला दिसत आहे. पण, यावेळी त्याच्याबरोबर असं काहीतरी होतं, जे पाहून तुम्ही पोट धरून हसाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक लहान मुलगा घोड्यावर बसला असून घोड्याचा मालक घोड्याने खेळावं म्हणून त्याला डिवचताना दिसतोय. घोड्याला डिवचल्यामुळे तो मोठमोठ्याने उड्या मारतो, ज्यामुळे घोड्यावर बसलेला मुलगा घाबरतो. घाबरलेल्या मुलाला पाहून मालक पुन्हा घोड्याला डिवचतो आणि हसतो. घोड्यावरील मुलगा पुन्हा घाबरतो आणि मोठमोठ्याने आपल्या गावरान भाषेत बोलू लागतो. तो घोड्याच्या मालकाला म्हणतो, “एकदाच सांगतुय गप बस..पटकन उतरव खाली नाहीतर घरी नाव सांगीन माझ्या”, त्या मुलाचं हे बोलणं ऐकून आसपास उभे असलेले सर्व जण मोठमोठ्याने हसतात. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावरही खूप चर्चेत असून नेटकरीही हसताना दिसत आहेत.

हेही वाचा: “काय नाचतेय ही…”, ‘ले तेरी हो गई यार’ गाण्यावर चिमुकलीने केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून कराल कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ x (ट्विटरवरील) या @viralcontent अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला आतापर्यंत तीन मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि एक लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “हा आता परत कधीच घोड्यावर बसणार नाही”, तर दुसऱ्या युजरने लिहिलेय, “स्वतःच्या लग्नातसुद्धा हा घोड्यावर बसायचा नाही.” तर तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “भावाची दहशत.. घरी नाव सांगणार”, तर आणखी एकाने लिहिलेय की, “घोडा पाहिला तरी लांबूनच हात जोडेल तो..”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video a boy sitting on a horse and carry users laugh after watching the video sap