Viral video : काही मंडळींना स्टंटबाजी करण्याची फारच हौस असते. ही मंडळी संधी मिळताच चित्र-विचित्र स्टंट करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करतात. पण, ही स्टंटबाजी काही वेळेस अंगाशीसुद्धा येते. स्टंटबाजांना नको त्या ठिकाणी मार बसतो आणि आयुष्यभरासाठी अपंगत्व येतं. वाहतुकीचे नियम मोडून रस्त्यावर वाहनांवर भन्नाट स्टंटबाजी करतानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. पण, व्हिडीओच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळविण्यासाठी धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांना चांगलीच अद्दलही घडल्याचे व्हिडीओ अनेकदा समोर आले आहेत. असाच काहीसा प्रकार आता समोर आला आहे. धावत्या लोकलच्या दरवाजात स्टंट करताना एका तरुणाची काय अवस्था झाली ते पाहा. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल.
रेल्वेत टवाळखोरांचा सुळसुळाट झाला आहे. अशाच टवाळखोरांची स्टंटबाजी पुन्हा एकदा समोर आली आहे. लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धावत्या रेल्वेगाडीत स्टंट करणे धोक्याचे आहे, हे सांगण्याची गरज नसते. मात्र, तरीही काही माथेफिरू धावत्या रेल्वेत स्टंट करून हकनाक आपला जीव धोक्यात घालतात. असाच एक तरुण रेल्वेत स्टंटबाजी करताना खांबाला धडकतो आणि रेल्वेबाहेर फेकला जातो.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लोकलच्या दरवाजात लटकून हा तरुण जीवघेणा स्टंट करीत होता. यावेळी समोरून आलेला खांब त्याला दिसला नाही आणि तो खांबाला जोरदार धडकला. ही धडक एवढ्या जोरात बसली की, तो थेट समोरच्या रुळावर फेकला गेला. या व्हिडीओमध्येही तो गाडीबाहेर फेकला जाऊन खाली पडताना दिसत आहे. तरुणाई रील कल्चरच्या एवढ्या मोहात पडलीय की, रील बनविण्याच्या नादात अनेकांना आपल्या जीवाचीही पर्वा राहत नाही. खरे तर क्रिएटिव्हिटीला वाव देणाऱ्या या रील कलेला विकृत रूप येऊ लागलेय का, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “गर्व कशाचा करता? वेळ बदलायला वेळ लागत नाही; VIDEO पाहून कळेल कर्माचं फळ म्हणजे नक्की काय
हा व्हिडीओ एक्सवर 46_tattooink_studio_karaikkudi नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे; ज्याला ५,१२,७६४ व्ह्युज मिळाले आहेत. त्यावर लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिले, अशा लोकांना फक्त पोलिसांचा लाठीमारच सुधारू शकतो.