Viral Video: या जगात मनुष्यापासून पशू-पक्ष्यांपर्यंत प्रत्येक जण संघर्षमय आयुष्य जगत असतो. मनुष्य आपल्या आयुष्यातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र झटतो. त्याचप्रमाणे प्राणी, पक्षीदेखील त्यांच्या आयुष्यातील भुकेसह अनेक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी काही ना काही करीत जीवनसंघर्ष करताना दिसतात. प्राण्यांच्या आयुष्यातील अनेक न पाहिलेल्या गोष्टी जंगलातील व्हिडीओंमुळे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, ज्यात तळ्यात पाणी पिण्यासाठी गेलेल्या म्हशीवर मगर हल्ला करताना दिसतेय.

जंगलातील अनेक व्हायरल व्हिडीओंमध्ये कधी बिबट्या, वाघ, सिंह या प्राण्यांना तुम्ही इतर प्राण्यांची शिकार करताना पाहिले असेल. या प्राण्यांव्यतिरिक्त तळ्यातील मगरही पाणी पिण्यासाठी गेलेल्या प्राण्यांवर हल्ला करते. आजपर्यंत मगरीच्या हल्ल्यांचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असतील. आतादेखील समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पाणी पिण्यासाठी तळ्यावर आलेल्या एका म्हशीवर मगर हल्ला करते. यावेळी म्हैसदेखील स्वतःला वाचविण्याचा खूप प्रयत्न करताना दिसते.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, जंगलातील एका तळ्यामध्ये काही म्हशी पाणी पिण्यासाठी आल्या आहेत. यावेळी पाण्यातून एक मगर हळूच येते आणि कळपातल्या एका म्हशीच्या तोंडावर हल्ला करते. मगरीने केलेला हल्ला पाहून आजपासच्या इतर म्हशी पळून जातात. यावेळी तावडीत सापडलेली म्हैस स्वतःचे तोंड मगरीच्या तावडीतून सोडविण्याचा शिकस्तीने प्रयत्न करते; परंतु सरतेशेवटी प्रयत्न थिटे पडल्याने ती अयशस्वी होते.

हेही वाचा: ‘आई जेवताना मोबाईल वापरू नको…’ चिमुकल्याने आईला दिला लाखमोलाचा सल्ला; पाहा मजेशीर VIDEO

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @latestkruger या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत दोन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि ४० हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. या व्हिडीओवर एका युजरने लिहिलेय, “तिच्या कळपातील म्हशींनी तिची मदत करायला हवी होती.” दुसऱ्या युजरने लिहिलेय, “थरारक व्हिडीओ.“ आणखी एकाने लिहिलेय, “शेवटी हा निसर्गाचा नियम आहे.”

Story img Loader