Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल हे कोणीच सांगू शकत नाही. दररोज विविध प्रकारचे व्हिडीओ सतत यावर व्हायरल झालेले आपण पाहतो. ज्यात काही युजर्स रील्स बनवताना तर कधी गाणी म्हणताना, डान्स करताना दिसतात. बऱ्याचदा प्राण्यांचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात, यातील काही व्हिडीओ खूप मजेशीर असतात तर काही व्हिडीओंमुळे आपला थरकाप उडतो. दरम्यान, आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून तुम्ही कपाळावर हात मारून घ्याल.
खेड्यात गाय, बैल, म्हैस, शेळी हे पाळीव प्राणी अनेक जण पाळतात. बऱ्याचदा हे प्राणी घराबाहेर चरायला नेल्यावर मालकाचा डोळा चुकवून कुठेही भटकतात. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक बैल असाच फिरत फिरत एका ठिकाणी पोहोचल्याचे दिसत आहे, जे पाहून अनेक जण आश्चर्यचकित झाले आहेत.
नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बैल फिरत फिरत चक्क एका पोलिस ठाण्यामध्ये पोहोचला आहे. पण, यावेळी तो पोलिस ठाण्याच्या आतमध्ये नाही तर पोलिस ठाण्याच्या वर बसल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधील असून येथील पोलिस ठाण्याच्या छतावर बैल फिरत असल्याचे दिसत आहे. यावेळी तो बैल शांत होता, पण त्याला पाहून पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
बराच वेळ बैल पोलिस ठाण्याच्या छतावर बसला होता, त्यामुळे त्याला खाली आणण्यासाठी पोलिस अनेक प्रयत्न करत होते, पण तो खाली येत नव्हता. शेवटी सर्वांनी हातात काठ्या घेतल्यावर तो घाबरला आणि त्याने खाली उडी मारली. ही घटना पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी झाली होती.
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ X(ट्विटरवरील) @RahulPathak1989 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत अनेक व्ह्यूज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्सदेखील करताना दिसत आहेत.
दरम्यान, यापूर्वी अशी एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली होती, जिथे पिसाळलेला बैल रस्त्यावरील लोकांना मारण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी एका पोलिस अधिकऱ्याने त्या बैलाला चोप दिला होता; तर परदेशातील व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये बैल मैदानातून थेट बाहेर पळत आला होता आणि त्याने अनेकांना जखमी केले होते.