तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये प्राणी आणि माणसाची मैत्री पाहिली असेल, जिथे पाळीव प्राणी त्यांच्या मालकाच्या कुटुंबाचा जीव वाचवतात. प्राण्याची निष्ठा दिसून आलेले अनेक किस्से ऐकले असतील, या मुक्या प्राण्यांना बोलता येत नसलं तरी त्यांना भावना असतात. घरात राहणारे पाळीव प्राणी घरातील सदस्यांचं संरक्षण करतात आणि गरज पडल्यास त्यांचं संरक्षण करण्यासाठी स्वतःचा जीव सुद्धा धोक्यात टाकतात. याच प्रत्यय देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका इमानदार मांजरीने चिमुकल्याला पायऱ्यावरून पडता पडता वाचवलंय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही नक्कीच भावूक व्हाल.
हा व्हिडीओ अमेरिकेतल्या कोलंबियामधला आहे. या व्हिडीओमध्ये एका चिमुकला घरात फरशीवर रांगत रांगत खेळताना दिसून येतोय. बाजुला एका सोफ्यावर मांजर सुद्धा दिसून येतेय. या व्हिडीओमधला चिमुकला रांगत रांगत आणखी पुढे जातो. पुढे पायऱ्या आहेत हे त्या मांजरीला माहित असल्यामुळे ती धावत धावत त्या चिमुकल्याकडे येते. हा चिमुकला त्याचा हात पुढे ठेऊन पायऱ्यांकडे जात असतानाच मांजरीने प्रसंगावधान दाखवत चिकल्याला मागे ढकलताना दिसून येते. हा चिमुकला आणखी पुढे जाऊ म्हणून ही मांजरी चिमुकल्याच्या पुढे जाऊन आपल्या पुढच्या दोन पायांनी त्याला मागे करताना दिसून येतेय. त्यानंतर हा चिमुकला मागे होऊन बसलेला दिसून येतोय. हा चिमुकला पुन्हा पुढे येऊन पायऱ्यांकडे जाईल म्हणून ती मांजर तिथेच दारावर उभी राहते. हे पाहून व्हिडीओमधला चिमुकला पुन्हा घरात जातो आणि मागे खेळतो.
घरातल्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी या मांजरीने आपली जीव धोक्यात तर टाकला आणि त्याला पायऱ्यावरून पडण्यापासून वाचवलं. प्राणी त्यांच्या पिल्लांच्या संरक्षणासाठी भयानक गोष्टींचा सामना करतात, हे अनेकदा तुम्ही पाहिलं असेल. पण हेच प्राणी माणसांच्या बाळांचं ही तितक्याच मायेच्या भावनेने संरक्षण करण्यासाठी आपला जीव धोक्यात टाकतात, हे या व्हिडीओमधून दिसून आलं.
अठरा सेकंदचा हा व्हिडीओ @aflyguynew1 नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर या व्हिडीओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं. हा व्हिडीओ तसा जुना आहे, पण मांजरीच्या या धाडसामुळे हा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आलाय. या व्हिडीओला आतापर्यंत ९० लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तसंच जवळपास पाच लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक जण मांजरीचं कौतुक करत वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.
काही युजर्स म्हणतात, “या मांजरीची कमाल आहे” तर आणखी दुसरे युजर्स म्हणतात, “मला सुरूवातीला मांजरी जास्त आवडत नव्हत्या. पण हा व्हिडीओ पाहिल्यानंतर मला सुद्धा मांजरी आवडू लागल्या आहेत.” तर काही युजर्सनी या व्हिडीओवर आपले वेगवेगळे तर्क लावण्यास सुरूवात केलीय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून येतोय.