Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा आपल्याला आपल्या कल्पनाशक्तीपलीकडच्या गोष्टी पाहायला मिळतात; ज्याचा आपण कधी विचारही केलेला नसतो. अनेकदा यावर प्राण्यांचेदेखील मजेशीर व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. त्यात कधी चक्क साप आणि माकड एकमेकांसोबत खेळताना दिसतात; तर कधी वाघ आणि कुत्रा एकत्र बसलेले दिसतात. अशा मनाला न पटणाऱ्या गोष्टी पाहिल्यावर आपल्याला काही क्षण आश्चर्य वाटतं. आतादेखील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
आतापर्यंत उंदीर आणि मांजर यांच्यामधील भांडणं आपण नेहमीच पाहिली आहेत. मांजर नेहमी आपली भूक भागविण्यासाठी उंदराच्या शोधात असते. आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येही उंदीर आणि मांजर यांचं असंच भांडण पाहायला मिळत आहे; जे पाहून तुम्हालाही हसू येईल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक मांजर खिडकीबाहेर लपलेल्या उंदराला बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. बराच वेळ प्रयत्न करूनही उंदीर काही केल्या तिथून बाहेर येत नाही. त्यानंतर पुढे व्हिडीओमध्ये मांजर उंदराला कुशीत घेऊन झोपलेले दिसत आहे. मांजर आणि उंदराचे हे प्रेम पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. सुरुवातीला जेव्हा मांजर उंदराला शोधत होते. तेव्हा ते त्याला खाण्यासाठी शोधत असणार, असं वाटतं; परंतु पुढे दोघंही खूप चांगले मित्र असल्याचं दिसत आहे.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, युजर्स त्यावर अनेक लाइक्स आणि कमेंट्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @gorkazkunwar69 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला जवळपास १० मिलियनहून अधिक व्ह्युज आणि १० लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.
हेही वाचा: अरे देवा! भरमंडपात रसगुल्ला खाल्ला नाही म्हणून वधूने वराला धोपटलं; VIDEO पाहून माराल कपाळावर हात
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओवर अनेक युजर्सदेखील कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरनं लिहिलंय, “बहुतेक ती मांजर भूक लागल्यावर उंदराला खाणार असेल.” आणखी एकानं लिहिलंय, “या नारंगी रंगाच्या मांजरी खूप विचित्र असतात.” तर आणखी एकानं लिहिलंय, “कदाचित मांजर उंदराला मोठा झाल्यावर खाणार असेल.” तर आणखी एकानं लिहिलंय, “ही मांजर खूप निरागस आहे.”