Viral Video: समाजमाध्यमांवर कधी काय पाहायला मिळेल हे सांगता येत नाही. त्यावर कधी विविध रील्स, गाणी, डान्स यांचे व्हिडीओ पाहायला मिळतात; तर कधी प्राण्यांचेदेखील अतरंगी व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये असंच काहीसं पाहायला मिळत आहे; जे पाहून तुम्हालाही हसू येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अनेक जण घरात कुत्रा आणि मांजर पाळतात, अनेक घरांमध्ये या प्राण्यांना घरातील सदस्यांइतकंच महत्त्व आणि प्रेम दिलं जातं. त्यांची आवड-निवड पूर्ण केली जाते. हल्ली या दोन्ही प्राण्यांचे वाढदिवसदेखील आवडीनं साजरे केले जातात. अशा अनेक कौतुक सोहळ्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात; पण आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका ब्युटी ब्रॅण्डनं आपल्या टीममध्ये मांजरीला सहभागी केलं आहे. यावेळी मांजरीच्या स्वागताची जय्यत तयारीदेखील करण्यात आली होती. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, या ऑफिसमधील सर्व टीम मेंबर्स मांजरीचे औक्षण करून, तिचं ऑफिसमध्ये स्वागत करतात. त्यानंतर मांजरीला एका पाळण्यामध्ये ठेवून तिचं कोकाया, असं नाव ठेवलं जातं. त्यानंतर मांजरीला घेऊन केक कापण्यात आला. त्यानंतर ही मांजर संपूर्ण ऑफिसमध्ये फिरताना दिसली. यावेळी सर्व जण तिच्यासोबत फोटो आणि व्हिडीओ काढण्यात व्यग्र होते. सोशल मीडियावर सध्या खूप मोठ्या प्रमाणात हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर @nariyalcosmetics या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये “हिचं नाव आम्ही कोकाया ठेवलं. आमच्या टीममधील दोन सदस्यांनी तिला शोधून काढलं”, असं लिहिण्यात आलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्युज आणि आतापर्यंत २४ हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा:
एका युजरनं कमेंटमध्ये लिहिलंय, “या मांजरीला एक सुंदर आयुष्य देऊन खूप चांगलं काम केलं आहे.” तर दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “धन्यवाद! तिची इतकी काळजी घेतल्याबद्दल.” तर तिसऱ्या युजरनं लिहिलंय की, तुम्ही सर्व जण खरंच खूप ग्रेट आहात. इतरही अनेक जण या टीमचं खूप कौतुक करताना दिसत आहेत.