‘आई ही आई असते’ मग ती पशू-पक्षांची असो वा माणसांची, आपल्या मुलांवरती आईचा तेवढाच जीव असतो. शिवाय मुलांसाठी ती काहीही करायला तयार असते. तसं बघायला गेलं तर प्राण्यांना पशू-पक्षांना एकमेकांपासून खूप धोका असतो, कारण अनेक प्राणी आपल्यापेक्षा लहान आणि दुबळ्या प्राण्याची शिकार करत असतात. सध्या अशाच एका कोंबडीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक शिकारी पक्षी तिच्या पिल्लांची शिकार करण्यासाठी आला असता, कोंबडी आपल्या पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी प्राण पणाला लावून लढताना दिसतं आहे. शिवाय ती पिल्लांच्या प्रेमाखातर अशी झुंज देते की शेवटी शिकार करायला आलेल्या पक्ष्याचीच शिकार झाल्याचं व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
हेही पाहा- बापरे! खेळण्यासाठी घरातच आणला विशाल अजगराला, काही सेकंदातच अजगराने खेळ खल्लास केला, पाहा थरारक Video
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये कोंबडी आपल्या पिलांसह मोकळ्या जागेत काही खाताना दिसत आहे. या पिल्लांशेजारी इतर कोंबड्याही फिरत असल्याचं आहेत. कोंबड्या आणि पिल्ले काहीतरी खात असताना अचानक आकाशात उडणारा एक शिकारी पक्षी पिल्लांची शिकार करण्याच्या उद्देशाने पिल्लांवर झडप घालतो आणि पिलांना पंजात पकडण्याचा प्रयत्न करतो. मात्र, याचवेळी या पिल्लांची आई त्याला शिकार करायला आलेल्या पक्ष्याचाच जीव घेताना व्हिडीओमध्ये दिसतं आहे.
कॅमेऱ्यात कैद झाला थरार –
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शिकारी पक्ष्याने पिल्लांवर हल्ला करताच शेजारी उभ्या असलेली पिल्लांची आई भरधाव वेगाने शिकारी पक्ष्यावर हल्ला करताना दिसून येत आहे. पक्ष्याला काही समजण्यापूर्वीच दुसरी कोंबडीही तिथे येते आणि दोघी मिळून त्या पक्ष्यावर तुटून पडतात. आपल्या पंजाने आणि चोचीने पक्ष्यावर जोरदार हल्ला करायला सुरुवात करतात. शिकारी पक्षी स्वतःला वाचवण्याचा खूप प्रयत्न करतो मात्र तो या रागवलेल्या आईच्या हल्ल्यापुढे त्याचं काहीही चालत नाही आणि शेवटी शिकारी पक्ष्याला आपला जीव गमवावा लागतो.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ beautiful_post_4u नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत ६ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. शिवाय अनेक नेटकऱ्यांना तो व्हिडीओ आवडला आहे असून ते या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया देत आहेत. एका नेटकऱ्याने, ‘आई ही मुलांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असते मग ती माणसाची असो वा पक्षांची’ अशी कमेंट केलं आहे. तर आईचं काळीज किती मोठं असतं याचंच हे उदाहरण असल्याचं म्हटलं आहे.