Viral Video: आई म्हटलं की प्रेम, वात्सल्य, ममता हे शब्द नकळत आपल्या ओठांवर येतात. प्रत्येक व्यक्तीला त्याची आई खूप प्रिय असते आणि म्हणूनच आई व मुलांचे हे ऋणानुबंध अजरामर असतात. आज (१२ मे) रोजी जगभरात ‘मदर्स डे’देखील साजरा केला जात आहे. याचदरम्यान एक आई आणि तिच्या पिल्लांचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; जो पाहून तुम्ही नकळत भावूक व्हाल.
आई आणि तिच्या मुलांचे प्रेम जगातील सर्वांत निर्मळ नातं मानलं जातं. मग ती आई एखादी व्यक्ती असो किंवा एखादा प्राणी. सोशल मीडियावर या प्रकारचे व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. त्यात कधी हत्ती आणि त्याचे पिल्लू असते; तर कधी वाघीण आणि तिची पिल्लं असतात. अशातच आता व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमध्ये एक कोंबडी तिच्या पिल्लांना एका भल्या मोठ्या नागापासून वाचविताना दिसत आहे.
हा व्हायरल व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @wilda_nimalearth या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता. एका गोठ्यात कोंबडी आणि तिची काही पिल्लं फिरत असताना अचानक तिथे सहा-सात फुटांचा नाग येतो. त्यावेळी नाग पिल्लांकडे जाण्याचा प्रयत्न करतो; पण कोंबडी त्याला पिल्लांपर्यंत पोहोचू देत नाही. नाग आणि कोंबडी यांच्यामध्ये बराच वेळ हा सामना रंगतो. कोंबडी तिच्या पायांनी नागाला बाजूला करायचा पुरेपूर प्रयत्न करते. एखादी कोंबडी आपल्या पिल्लांचं संरक्षण करण्यासाठी किती जीवाचा आटापिटा घेत असेल, हे त्या व्हिडीओतून कोंबडी आपल्या पिल्लांना वाचविण्यासाठी जे प्रयत्न करते त्यावरून लक्षात येते. हा हृदयस्पर्शी व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, युजर्स यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.
या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. त्यातील एकानं लिहिलंय की, आई नेहमीच सुपरहिरो असते, तर दुसऱ्यानं लिहिलंय की, हे फक्त आईच करू शकते. तर, तिसऱ्या एका व्यक्तीनं लिहिलंय की, आईसारखं प्रेम मुलांवर कोणीच करू शकत नाही. या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत जवळपास अडीच लाखांहून अधिक व्ह्युज मिळाल्या असून, दोन हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.
पाहा व्हिडीओ:
दरम्यान, यापूर्वीदेखील आई आणि तिच्या पिल्लांचं प्रेम दाखविणारे काही व्हिडीओ व्हायरल झाले होते; ज्यातील एका व्हिडीओमध्ये वाघिणीसोबत तिची पिल्लं खेळताना दिसत होती. तर, आणखी एक व्हिडीओ एक हत्तीचं पिल्लू त्याच्या आईला शोधताना व्याकुळ झालं होतं, जेव्हा आई त्याला सापडली तेव्हा तो खूप खूश झाला होता. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत होता.