Viral Video: समाजमाध्यमांवर विविध विषयांवर आधारित व्हायरल झालेले व्हिडीओ नेहमीच चर्चेत असतात. त्यात बऱ्याचदा प्राण्यांचेदेखील अनेक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. प्राण्यांच्या व्हिडीओंमध्ये कधी प्राण्यांचे हिंसक रूप आपल्याला पाहायला मिळते; तर कधी आपल्याला प्राण्यांच्या गमती-जमती दिसतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यात भररस्त्यात गाईबरोबर असं काही झालेलं पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्ही अवाक् व्हाल.

भारतीय लोक गाईला आई मानून तिची पूजा करतात. त्यामुळे गाईला गोमातादेखील म्हटलं जातं. गाय फक्त तिच्या वासरांनाच नाही, तर माणसांनाही आईसारखा जीव लावताना दिसते. पण, अनेकदा काही लोक मुद्दाम किंवा नकळत गाईबरोबर असं काही करतात जे पाहून अनेकांना धडकी भरते. आता सोशल मीडियावरील असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे, जो पाहून तुम्हीही हळहळ व्यक्त कराल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका मोठ्या रस्त्यावरून गाड्या वेगाने जात असून यावेळी अचानक एक गाय रस्त्यावरून पळत जाताना दिसते, परंतु गाय अचानक आल्यामुळे रस्त्यावरून जाणाऱ्या एका वाहनचालकाला काहीच सुचत नाही, त्यामुळे त्याच्या गाडीची धडक गाईला लागते आणि गाय जोरात खाली पडते. गाईला वाहनचालकाकडून नकळत लागलेली धडक पाहून नेटकरीही या व्हिडीओवर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत, तर काही जण वाहनचालकाला दोषी ठरवत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @superbike310rr या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत दोन लाखांहून अधिक व्ह्युज आणि चार हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

हेही वाचा: ‘तृतीयपंथींबरोबर प्रँक करणं पडलं महागात…’ तरुणाने टाळ्या वाजवत मागितले पैसे; पुढे असं काही घडलं.. VIDEO पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या व्हिडीओवर कमेंट करीत एका युजरनं लिहिलंय, “यात कोणाचीच चुकी नाही, यात त्या गाईला एकटं सोडलेल्या व्यक्तीची चुकी आहे.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “कृपया गाडी हळू चालवा.” आणखी एकानं लिहिलंय, “चुकी सरकारची आहे.” आणखी एकानं लिहिलंय, “ही गाय ज्या मालकाची आहे त्याची चुकी आहे.”

v

v