Viral Video: सध्याचे कडाक्याचे ऊन पाहता, कधी एकदाचा पाऊस पडतोय याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. या उन्हामुळे अंगाची अक्षरशः लाही लाही होते. त्यामुळे या उन्हाला केवळ माणसंच नाही तर प्राणी, पक्षीदेखील वैतागले आहेत. अशा वातावरणामध्ये अचानक पाऊस पडल्यावर मन खूप सुखावते. असाच एक मनाला आनंद देणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एक श्वान पावसाचा मनसोक्त आनंद लुटताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत असून, त्यावर युजर्सही अनेक मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत.
सोशल मीडियावर श्वानांचे अनेकविध व्हिडीओं व्हायरल होत असतात. या व्हिडीओंमध्ये एक श्वान मोबाईलमध्ये रील्स पाहताना दिसतो; तर कधी श्वान खेळताना दिसतो. आता नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये श्वान घरातल्या मालकिणीला चकवून पावसाचा आनंद लुटताना दिसत आहे.
या व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता की, एका महिला घरात जाण्यासाठी घराचे गेट उघडते. यावेळी ती आतमध्ये येताच उघडलेल्या दरवाजातून श्वान पटकन घराबाहेर पळून जातो आणि घराच्या जवळच असलेल्या इमारतीच्या पाइपमधून पडणाऱ्या पाण्याखाली उड्या मारत मारत मनसोक्त भिजतो. श्वानाचे हे मनसोक्त भिजणे पाहून तो अनेक दिवसांपासून पावसाची वाट पाहत असल्याचं दिसत आहे.
हेही वाचा: मोबाईलचा नाद लय बेक्कार! आई-वडिलांनी लेकीसाठी पाळला श्वान; पण त्यालाही लागले रील्स पाहण्याचे वेड
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ एक्स (पूर्वीचे ट्विटर)वरील @?o̴g̴ या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करीत कॅप्शनमध्ये, प्युअर एन्जॉय (pure enjoy) असं लिहिण्यात आलं आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्सदेखील करत आहेत. एकाने लिहिलंय, “मी माझ्या आयुष्यात पाहिलेला सर्वांत आनंदी श्वान.” तर, दुसऱ्यानं लिहिलंय, “याच्या आयुष्यातील सर्वांत मोठा आनंद.” तर, आणखी एकानं लिहिलंय, “असंच आयुष्य जगायला हवं प्रत्येकानं”
या व्हिडीओला आतापर्यंत १० मिलियनहून अधिक व्ह्युज; तर एक मिलियनहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. हा व्हिडीओ सध्या खूप चर्चेत आहे.