ट्रेन, मेट्रो, बस अशा अनेक वाहनांमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रवासी जीवाचं रान करतात. लोकलमध्ये तर सीटसाठी लोकांमध्ये भांडण होणारे कितीतरी व्हिडीओ आपण सोशल मीडियावर दररोज पाहत असतो. नुकताच मुंबईमधील एका ट्रेनचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये सीटसाठी काही महिलांमध्ये तुफान हाणामारी झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र याउलट एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राण्यांसंबंधी अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. लोकांना वेगवेगळे प्राणी पाळायला फार आवडतात. मात्र रस्त्यावरील प्राण्यांपासून ते अंतर राखतात किंवा त्यांना झिडकारतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. यामध्ये आपण एक गच्च भरलेली बस पाहू शकतो. विशेष म्हणजे या बसमध्ये एक कुत्रा सीटवर आरामात झोपला आहे. मात्र कोणीही त्या कुत्र्याला सीटवरून उठवलं नाही. उलट त्या गर्दीतही लोकांनी उभं राहणं पसंत केलं.

Viral: “माझं मृत्युपत्र हरवलंय…” वृत्तपत्रातील विचित्र जाहिरातीवर नेटकऱ्याची भन्नाट कमेंट; म्हणाला, “स्वर्गातून…”

हा हृदयस्पर्शी व्हिडीओ नेटकऱ्यांना खूपच आवडला आहे. तसंच, तो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शेअरही केला जात आहे. स्टेफेनो या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलंय, “या कुत्र्याने बसमधील दोन जागा अडवून ठेवल्या होत्या, मात्र कोणत्याही प्रवाशाने त्याची झोप मोड केली नाही.” या गच्च भरलेल्या बसमधील प्रवासी बसण्यासाठी जागा मिळण्याची प्रतीक्षा करताना आपण पाहू शकतो. कुत्र्याने दोन सीट्स अडवल्या असल्या तरीही कोणीच त्याला उठवलं नाही. या क्लिपमध्ये दोन सीटवर शांतपणे झोपलेल्या कुत्र्याभोवती उभे असलेले प्रवासी आपण पाहू शकतो.

Viral Video : व्हिएतनामी फूड ब्लॉगरने पहिल्यांदाच चाखली पाणीपुरीची चव; रिअ‍ॅक्शन होतेय व्हायरल

हा व्हिडीओ आतापर्यंत ५५ हजारांहूनही अधिकवेळा पाहिला गेला आहे. या व्हिडीओने सर्वांचेच मन जिंकले असून अनेकजण यावर प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहलंय, “मला आशा आहे पृथ्वीवरून मानवता कधीही नाहीशी होणार नाही.” तर दुसऱ्याने लिहलंय, “दहशतवादाच्या या युगात मानवतेवरील विश्वास कायम ठेवणारी एक छोटीशी गोष्ट.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video a dog was sleeping very peacefully in a crowded bus you will also appreciate what the travelers have done next pvp