सध्या सगळीकडे लग्नसराईचे दिवस सुरू असून यादरम्यानचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडे सोशल मीडियाचा वापर केवळ शहरातच नाही तर गावांमध्येही मोठ्या प्रमाणात केला जातो. या माध्यमातून गावातील अनेक गोष्टी जगभरात दिसतात. यातील काही गोष्टी अशा असतात, ज्या अनेकांनी कधी पाहिलेल्याही नसतात. असाच एक गावातील लग्नाचा भन्नाट व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून युजर्स अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.
लग्न म्हटलं की वर आणि वधूचा थाटमाटही येतोच. हल्ली अनेक जोडपी आपल्या लग्नातील मंडपात जाताना कशी एन्ट्री घ्यायची याकडे बारकाईने लक्ष देतात. अनेकदा नवरा मुलगा लग्नात घोड्यावरून एन्ट्री घेतो, तर काहीवेळा तो डान्स करतही एन्ट्री घेतो. अशा धमाकेदार एन्ट्रीमुळे नेहमीच लग्नातील पाहुण्यांचे लक्ष वेधले जाते. पण, या समोर आलेल्या व्हिडीओतील नवऱ्याने अशी हटके एन्ट्री घेतलीये, जी पाहून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
हा व्हायरल व्हिडीओ एका खेडेगावातील असून या व्हिडीओमध्ये दिसणारा नवरा बैलगाड्यातून लग्नाला जात असल्याचं दिसत आहे. यावेळी तो नवऱ्याच्या पोशाखातच बैलगाड्यात बसला होता, तसेच त्याने त्याच्या बैलांनादेखील खूप छान सजवलेलं दिसत आहे. नवरा मुलगा स्वतःच्या हाताने हा बैलगाडा चालवत आहे, शिवाय या बैलगाड्यासमोर काही वाजंत्रीदेखील उभे असल्याचे दिसत आहे. बैलगाड्यामधून जाणाऱ्या नवऱ्याला पाहण्यासाठी आजूबाजूला अनेकांनी गर्दी केली होती.
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून याला इन्स्टाग्रामवरील @shetivadi या अकाउंटवर पोस्ट केले आहे, तसेच हा व्हिडीओ पोस्ट करत त्यावर “हा नक्कीच बैलगाडाप्रेमी असेल” असं लिहिलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत एक लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून, एक हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत.
हेही वाचा: माकडाने केले कुत्र्याच्या पिल्लाला किडनॅप; VIDEO पाहून युजर्स म्हणाले, “हा कुठल्या जन्मातला बदला”
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओवर अनेक जण नवऱ्याचं कौतुक करताना दिसत आहेत, तर काही जण नवऱ्याची खिल्ली उडवतानादेखील दिसत आहेत. यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलं की, “हळू जा, नाहीतर कंबरेत लाथ बसेल.” दरम्यान, याआधीदेखील एका शेतकऱ्याच्या मुलाने आपल्या पत्नीसोबत बैलगाडीतून एन्ट्री केली होती, यावेळीदेखील हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता.