Viral Video: जगात आई एवढे प्रेम तिच्या मुलांवर कोणीही करत नाही. मग ती आई एखादी व्यक्ती असो किंवा प्राणी, आई नेहमीच प्रत्येक गोष्टीत स्वतःआधी आपल्या लेकरांचा विचार करते. स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांचे पोट भरते. आईच्या तिच्या मुलांवरच्या प्रेमाची एक नाही लाखो उदाहरण आहेत. ज्यातून मुलांबद्दलचे निस्वार्थ प्रेम दिसून येते. आता एका परिसरातील जंगालातील एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक बिबट्या आपल्या पिल्लाच्या मदतीसाठी काही व्यक्तींकडे याचना करत असल्याचे दिसत आहे.

वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी अनेकदा मानवी वस्तीमध्ये फिरत असल्याची बातमी जरी आपल्या कानी पडली तरी अनेक जण घराबाहेर पडायला घाबरतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील. ज्यातील काही व्हिडीओंमध्ये जंगलातील हिंस्र प्राणी मनुष्यांवर हल्ला करताना दिसले असतील. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्यात एक बिबट्या मनुष्य वस्तीत आल्याचे दिसत आहे. पण, यावेळी तो कोणावरही हल्ला करत नाही. मात्र, असं काहीतरी करताना दिसत आहे, जे पाहून तुम्ही अवाक् व्हाल.

Savlyachi Janu Savli
Video : “तारा आणि भैरवीचे सत्य…”, जगन्नाथचा प्लॅन यशस्वी होणार? ‘सावळ्याची जणू सावली’ मालिकेत ट्विस्ट
Eknath Shinde
Eknath Shinde : तुम्ही गृहखातं, विधानसभा अध्यक्षपद मागितलं…
Uddhav Thackeray on PM Narendra Modi
“आधी मणिपूर ‘सेफ’ करा आणि मग…”; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं मोदी सरकारवर टीकास्र!
Milind Gawali
“त्या मावशींनी मला शिव्यांची लाखोली…”, ‘आई कुठे काय करते’ फेम मिलिंद गवळींनी सांगितला किस्सा
Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
cutest puppies following traffic rules
Viral Video : ही चाल तुरुतुरु…! रस्ता ओलांडणाऱ्या श्वानाच्या पिल्लांना पाहून नेटकरी पडले प्रेमात; म्हणाले, “फक्त अशी साथ…”

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बिबट्या मादी मानवी वस्तीमध्ये शिरून काही व्यक्तींच्या जवळ जाताना दिसत आहे. पण, यावेळी ती मादी कोणाचीही शिकार करण्यासाठी गेली नसून ती मदत मागण्यासाठी गेलेली आहे. या बिबट्या आईचे पिल्लू विहिरीत पडले असून ती तिच्या पिल्लाला वाचवण्यासाठी रस्त्यावर दिसत असलेल्या व्यक्तींकडे विनवणी करताना दिसतेय. सुरुवातीला तिला नक्की काय हवंय हे कोणाच्याच लक्षात येत नाही. परंतु, नंतर सर्वांच्या लक्षात येतं. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत असून यावर नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @akshayk_54 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत सहा लाखांहून अधिक व्ह्युज आणि हजारोंहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक जण कमेंट्स करतानादेखील दिसत आहेत.

हेही वाचा: ‘शेवटी त्याच्या जीवन-मरणाचा प्रश्न होता’, सिंहाने केला बिबट्यावर हल्ला; पण बिबट्याने केलं असं काही… पाहा थरारक VIDEO

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या व्हिडीओवर कमेंट करत एका युजरनं लिहिलंय, “काही झालं तरी आई ही आईच असते, मग ती माणसाची असो किंवा जनावरांची.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय,“आई म्हणजे ईश्वर”आणखी एकानं लिहिलंय, “तरीही लोक मदत करू शकत नाही, कारण स्वभाव.” आणखी एकानं लिहिलंय, “काय करणार, आई ती आईच असते.”