Viral Video News: सध्या सगळीकडे दिवाळीची धामधूम पाहायला मिळत आहे. भारतात हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण या सणाची आतुरतेने वाट पाहतो. या दिवसात सणाबरोबरच फटाके वाजवले जातात. खरंतर, फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनी प्रदूषण होते, पण तरीही अनेक जण आनंद साजरा करण्यासाठी फटाके वाजवतातच. शिवाय फटाके वाजवताना जीवघेणे स्टंटदेखील करतात, ज्यात बऱ्याचदा काहींना गंभीर दुखापत होते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय, ज्यात एक तरुण स्वतःच्या घरामध्ये वडिलांना घाबरवण्यासाठी असं काहीतरी करताना दिसतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मुलगा वयात आला की तो आपल्या आई-वडिलांचा आधार बनतो. घरातील जबाबदाऱ्यांसह आई-वडिलांची वेळोवेळी तो काळजी घेतो, त्यांना कधीही कोणती दुखापत होणार नाही याकडे तो काटेकोरपणे लक्ष देतो. पण, हल्ली अशी काळजी घेणारी मुलं खूप कमी पाहायला मिळतात. आताच्या काळात अनेक तरुण आई-वडिलांची काळजी घेण्याऐवजी त्यांना भयंकर मनस्ताप देतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतील तरुणही असंच काहीतरी करताना दिसतोय, जे पाहून नेटकरीही तीव्र संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घरामध्ये एक मुलगा सोफ्यावर झोपला असून सोफ्याच्या खालच्या बाजूला जमिनीवर बसून त्याचे वडील टीव्ही पाहत आहेत, यावेळी तो मुलगा हळूच वडिलांच्या मागे एक फटाका लावतो. फटाका जोरात वाजल्यामुळे त्याचे वडील घाबरून तिथून बाजूला होतात. वडिलांना घाबरलेलं पाहून तो तरुण हसू लागतो. तरुणाने वडिलांबरोबर केलेला हा मुर्खपणा पाहून नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘डान्स करताना वय नाही पाहायचं…’, ‘बहरला मधुमास नवा’ गाण्यावर चिमुकलीचा हटके डान्स अन् जबरदस्त एक्स्प्रेशन्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ ट्विटरवरील @PrathamWaidande या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत जवळपास पाच मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि लाखो लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत. त्यातील एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, “निव्वळ निर्लज्जपणा आहे”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “नवीन जनरेशनची मुलं” तर तिसऱ्याने लिहिलंय की, “वेडा आहे का हा?”, तर आणखी अनेक युजर्स व्हिडीओवर संताप व्यक्त करताना दिसत आहेत.