Viral Video: हल्लीच्या काळात काही मोजके लोक सोडल्यास सोशल मीडियाचा वापर प्रत्येक जण करताना दिसतो. काही लोक सोशल मीडियाचा वापर फक्त रील्स, गाणी, डान्स पाहण्यासाठी आणि नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी करतात; तर अनेक जण त्यातून भरपूर पैसेदेखील कमावतात. आपल्या व्हिडीओला जास्तीत जास्त व्ह्यूज अन् लाइक्स मिळाव्या यासाठी विविध देशांतील विविध भाषेतील गाण्यांवर रील्स बनवतात. आतापर्यंत अनेक परदेशी कलाकारांना आणि इन्फ्लूएन्सर्सलादेखील अनेक चर्चेत असलेल्या भारतीय गाण्यांवर आपण थिरकताना पाहिले आहे. आता परदेशी इन्फ्लूएन्सर्सचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यामध्ये ती महाराष्ट्रीयन लूकमध्ये एका मराठी गाण्यावर नाचताना दिसत आहे.
सध्या कधी कुठलं गाणं व्हायरल होईल हे सांगता येत नाही. जेव्हापासून रील्स बनविण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे, तेव्हापासून सतत विविध भाषांतील, विविध देशांतील नवनवीन गाणी व्हायरल होतात; ज्यावर लाखो लोक रील बनवतात. मागील काही दिवसांपासून गुलाबी साडी हे गाणं खूप चर्चेत होतं, ज्यावर अनेकांनी रील्स बनवल्या होत्या. दरम्यान, आता ‘नाच गो बया’ हे मराठी गाणं सर्वत्र चर्चेत आहे, ज्यावर अनेक जण रील्स बनवताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक इन्फ्लूएन्सर महिला निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसून नाकात नथ, हातात बांगड्या असा संपूर्ण मराठमोळा साज घालून ‘नाच गो बया’ या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरचे एक्स्प्रेशन खूप लक्ष्यवेधी आहेत. या महिलेने “कॅप्शनमध्ये शांताबाई आली रे… नाच गो बया”, असं लिहिलं आहे.
हेही वाचा: बापरे! तरुणीने चक्क वाघाचे घेतले चुंबन अन् पुढे जे घडले… VIDEO पाहून उडेल थरकाप
पाहा व्हिडीओ:
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @itsnotkadi या अकाउंटवर शेअर करण्यात आली असून यावर आतापर्यंत जवळपास आठ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत व अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत. यावर एका नेटकऱ्याने लिहिलंय की, “तुम्हाला लवकरच इंडियात यावं लागेल, कारण तुम्हाला मराठी चित्रपट नक्की मिळेल”, तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिलंय की, “खूप छान आमची मराठी संस्कृती जपली”, तर तिसऱ्या युजर्सने लिहिलंय की, “खूप छान परफॉर्मन्स”, तर आणखी एका युजरने लिहिलंय की, “अय्या, खूप गोड दिसताय तुम्ही.”
दरम्यान, यापूर्वीदेखील अनेक प्रसिद्ध इन्फ्लूएन्सर्सनी मराठमोळ्या गाण्यांवर सुंदर रील्स शेअर केले होते, ज्याचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर खूप चर्चेत होते.