Wedding Viral Video: सोशल मीडियावर सातत्याने विविध प्रकारचे व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. यावर बऱ्याचदा लग्नातील अनेक गमतीशीर गोष्टीदेखील पाहायला मिळतात. लग्नसमारंभ म्हटलं की नाच-गाणी, मजा-मस्ती, दंगा असतोच. लग्नातील विविध प्रथांमध्ये खूप गमतीशीर गोष्टी बघायला मिळतात. लग्नात हार घालण्यावरूनही अनेकदा गोंधळ उडतो; तर कधी नवऱ्या मुलाचे बूट चोरण्यावरूनही राडा झालेला पाहायला मिळतो. अनेकदा काही लग्नांमध्ये वर पक्ष आणि वधू पक्षामध्ये भांडणं झालेली पाहायला मिळतात. यादरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होत असतात. पण, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका तरुणाने असं काहीतरी केलंय, जे पाहून तुम्हालाही हसू येईल.
मित्र म्हटलं की, चेष्टा, गमतीजमती, मस्करी या सर्व गोष्टी आल्याच. अलीकडे लग्नांमध्ये बरेच मित्र आपल्या मित्राची त्याच्या भावी पत्नीसमोर काहीतरी मस्करी करताना दिसतात. या संदर्भातील अनेक व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहिलेच आहेत. सध्या व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हीदेखील कपाळावर हात मारून घ्याल.
नक्की काय घडलं या व्हिडीओमध्ये? (Wedding Viral Video)
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भरमंडपात लग्नविधी सुरू असताना अचानक नवरदेवाच्या एका मित्राची एंट्री होते. पण, यावेळी तो मित्र स्वतःसोबत कॉटन कँडी घेऊन येतो, शिवाय त्याच्या दुसऱ्या हातात एक घंटीदेखील होती. यावेळी तो तरुण स्टेजवर उभ्या असलेल्या वधू-वराकडे हातातील घंटी वाजवत जातो. तरुणाची ही कृती पाहून लग्नातील इतर लोकही त्याच्याकडे बघून हसू लागतात. स्टेजवर जावून तरुण वधू-वराबरोबर फोटो काढतो आणि नाचायला सुरुवात करतो. त्यानंतर वधू-वराला कॉटन कँडी गिफ्ट देतो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून इन्स्टाग्रामवरील @sukuuuuuuuuuuuuuun या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत दोन मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तसेच यावर एक लाखाहून अधिक लाइक्सदेखील मिळाल्या आहेत. शिवाय अनेक युजर्स या व्हिडीओवर संताप व्यक्त करत आहेत.
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “असे मित्र असल्याने आयुष्यात आनंद आहे का आनंदात आयुष्य आहे हे लक्षात येणार नाही”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “मस्तीखोर मित्र पाहिजेत ना राव”, तिसऱ्या युजरने लिहिलेय, “पाठीमागचं गाणं आणि ती cotton candy.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “नाद पाहिजे ओ बाकी काय नाही.”