Viral Video: अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा मनुष्यांसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. जगातील कुठलाही सजीव असो प्रत्येक जण आपली भूक भागवण्यासाठी संघर्ष करत असतो. मनुष्य आपली दोन वेळची भूक मिटवण्यासाठी आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी दिवस-रात्र कष्ट करतात, त्याचप्रमाणे हिंस्त्र प्राणीदेखील आपली भूक भागवण्यासाठी जंगलातील प्राण्यांची शिकार करताना दिसतात. त्यासाठी बऱ्याचदा त्यांनादेखील खूप मेहनत घ्यावी लागते, युक्ती लढवावी लागते. सोशल मीडियावर अशा प्रकारचे प्राण्यांच्या शिकारीचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात; आतादेखील असाच एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून तुमचाही थरकाप उडेल.

सोशल मीडियावर नेहमी विविध व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात, ज्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चित्ता एका हरणाची शिकार करण्यासाठी युक्तीचा आणि शक्तीचा अनोख्या पद्धतीने वापर करताना दिसतोय. हा थरकाप उडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
AI camera alerts authorities to halt train near Odisha elephant herd averting major accident video viral
अचानक रुळावर आला हत्तींचा कळप अन्….; पुढे जे घडले ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, Video Viral
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक
do you know which fort is this
हा कोणता किल्ला आहे, तुम्ही ओळखू शकता का? Viral Video एकदा पाहाच

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून, यावेळी एक बिबट्या त्याच्या शिकारीच्या शोधात असताना त्याला एका ठिकाणी हरीण दिसते. बिबट्या बराचवेळ हरणाच्या हालचालींवर लक्ष ठेवतो आणि हळूहळू त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करतो. पुढे तो एका झाडामागे लपतो. हरीण त्या जागेवरून दुसरीकडे जाणार इतक्यात बिबट्या हरणावर झडप घालण्यासाठी धावतो आणि वाऱ्याच्या वेगाने हरणाची शिकार करतो. या व्हिडीओमध्ये बिबट्याने वापरलेल्या रणनीतीचे अनेक जण कौतुक करत आहेत.

हेही वाचा: VIDEO: “इच्छाधारी नागीण…”, गुहेत सापडली तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेली महिला; ‘नागीण’ म्हणून लोक करतायत पूजा

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @wildlifearthh या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याच्या कॅप्शनमध्ये, “बिबट्या शिकार करायला झाडामागे लपून बसला होता” असे लिहिले आहे. या व्हिडीओवर आतापर्यंत पंधरा हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या असून यावर अनेक लाइक्स मिळाल्या आहेत.

दरम्यान, यापूर्वीदेखील अशा प्रकारचे अनेक थरकाप उडवणारे व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यात कधी वाघाने तर कधी चित्त्याने प्राण्यांची शिकार केली होती.

Story img Loader