Dance Viral Video: सोशल मीडियावर नवनवीन गाणी, डान्स व्हिडीओ अशा प्रकारच्या विविध गोष्टी व्हायरल होत असतात. व्हायरल झालेल्या गाण्यांवर, डायलॉग किंवा डान्स स्टेप्सवर लोक मोठ्या प्रमाणात रील्स बनवताना दिसतात. मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू अशा विविध भाषांतील गाणी रील्सच्या माध्यमातून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहेत, ज्यावर अनेक जण डान्स करताना दिसून येतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत.

समाजमाध्यमांमुळे लहान मुलांचे अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. ट्रेंडिंग गाणी, नवीन चित्रपट, त्यातील डायलॉग मुलांचे तोंडपाठ असतात. हल्लीची ही मुलं सोशल मीडियावरील बदलत्या ट्रेंडनुसार वागताना, बोलताना दिसतात. सोशल मीडियाप्रती मुलांमध्ये खूप उत्सुकता आणि आकर्षण आहे, त्यामुळे सोशल मीडियावर आपणही इतरांप्रमाणे आपली कला सादर करून प्रसिद्धी मिळवावी, यासाठी मुलं आणि त्यांचे पालक खूप प्रयत्न करताना दिसतात. मागील काही दिवसांपासून एका चिमुकलीचे अनेक सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ही चिमुकली विविध गाण्यांवर सुंदर डान्स करताना दिसतेय. आताही तिचा एक व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे.

The little girl dance
“आईशप्पथ, काय नाचतेय ही…”, चिमुकलीने भररस्त्यात केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक
15th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
१५ सप्टेंबर पंचांग: आनंदाची वार्ता ते प्रेम, मैत्रीची साथ; १२ पैकी कोणत्या राशीचा हसत-खेळत जाणार रविवार; वाचा तुमचे राशिभविष्य
namrata sambherao dance on kolhapuri halgi with husband
कोल्हापुरी हलगीवर नम्रता संभेरावने पतीसह धरला ठेका! नेटकरी कौतुक करत म्हणाले, “आपली संस्कृती…”
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
Teachers dance with students on nach re mora ambyachya vanat song Annasaheb Kalyani Vidyalaya satara video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” शिक्षक असावा तर असा! साताऱ्यात शिक्षक विद्यार्थ्यांचा जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच
School teacher dance on nach re mora song with student buldhana school video
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” बुलाढाण्याच्या जिल्हा परिषद शाळेत सरांचा जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच
Dirty Ice Cream Making Video never buy and eat 5 rupees ice cream in shop
पाच रुपयांत मिळणारे कप आईस्क्रीम खाणाऱ्यांनो ‘हा’ Video पाहाच; पुन्हा खाताना १०० वेळा कराल विचार

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली तिच्या घरामध्ये ‘नीचे फूलों की दुकान’ या बॉलीवूडमधील जुन्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. चिमुकली या गाण्यावर डान्स करता करता जबरदस्त स्टेप्स आणि सुंदर एक्स्प्रेशन्सही देत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kathashinde या अकाउंटवर शेअर केला असून, यावर आतापर्यंत अठरा मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत, तर पाच लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. यावर अनेक युजर्स कमेंट्स करत आहेत.

हेही वाचा: किली पॉलचा भारतीय गाण्यावर जबरदस्त अभिनय; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘खूप सुंदर डान्स’, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘ही मुलगी खूप क्यूट आहे’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘एक नंबर डान्स’, तर आणखी एकाने लिहिलंय की, ‘मोठी होऊन चांगली डान्सर होईल.’