Tiger Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा जंगलातील प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात कधी प्राण्यांच्या गमती जमती सुरू असतात, तर कधी प्राण्यांची भांडणं आपल्याला पाहायला मिळतात. सध्या उत्तराखंडच्या जंगलातील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय, ज्यामध्ये एक वाघ अतिशय चलाखपणे हरणाच्या पिल्लाचा मागोवा घेताना दिसत आहे.
वाघाचं शिकार कौशल्य पाहून तुम्हीही व्हाल चकित
सध्या व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आयएएस (IAS) अधिकारी संजय कुमार यांनी त्यांच्या एक्स (ट्विटर) वर शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला वाघ गवतातून हळूहळू पुढे जात अचानक हरणाच्या पिल्लावर झडप घालतो आणि त्याला आपल्या तोंड्यामध्ये पकडून घेऊन जातो. हा व्हिडीओ शेअर करत संजय कुमार यांनी कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “जंगलात लपून बसणं ही रोजचीच बाब आहे. शिकार शिकाऱ्यापासून पुरेपूर लपून राहण्याचा प्रयत्न करतो आणि या अन्नसाखळीच्या अग्रस्थानी असलेला शिकारी निसर्गाचे संतुलन राखतो. कॉर्बेट टीआरच्या ढिकाला येथे या वाघाला नुकत्याच जन्मलेल्या हरणाच्या पिल्लाचा वास येत होता.”
हेही वाचा : VIDEO : विमानात चिमुकल्याने आईला दिलं सरप्राईज; अचानक झालेली ‘ही’ घोषणा ऐकून तुमचेही डोळे पाणावतील
पाहा व्हिडीओ
आयएएस (IAS) अधिकारी संजय कुमार यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला आत्तापर्यंत जवळपास ४,६०० पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले असून युजर या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “हरणाच्या पिल्लासोबत खूप वाईट झालं, असं वाटतंय याला खाऊन वाघाचा फक्त नाष्टा होईल.” तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “वाघाने किती पद्धतशीरपणे शिकार केली आहे.” आणखी एका युजरने लिहिलंय की, वाघाची नजर आणि कान तीक्ष्ण असतात, पण त्याचे नाक एवढे पॉवरफूल नसते.”