Viral Video : प्री- वेडिंग शूटचा एक नवीन ट्रेंड आला आहे. कोणतेही लग्न प्री- वेडिंग शूटशिवाय होत नाही. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका इन्फ्लुअन्सरनी लग्नाचा प्री- वेडिंग शूट केला आहे. तिने हे प्री वेडिंग शूट हिमाचल प्रदेशातील स्पीति वॅलीमध्ये केले आहे. या प्री वेडिंगचा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे कारण या इन्फ्लुअन्सर तरुणीने चक्क मायनस २२ डिग्री सेल्सियस तापमानात हे शूट केले आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आर्या वोरा असे या सोशल मीडिया इन्फ्लुअन्सरचे नाव आहे. तिने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की मायनस २२ डिग्री सेल्सियस या प्रचंड थंडीच्या तापमानात आर्याने स्लीव्हलेस गाउन घातले आहे आणि फोटो आणि व्हिडीओ शूट केले आहे. एवढी थंडी असताना सुद्धा तिने जॅकेटसारखे गरम कपडे घातलेले नाही. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की प्रचंड थंडीमुळे या इन्फ्लुअन्सर आर्याची तब्येत खालावली आहे. पुढे व्हिडीओत तिने स्वत:भोवती ब्लँकेट ओढलेली दिसत आहे. तिचा ऑक्सिजन देण्याचा प्रयत्न केला जात आहे. तिने सांगितले की तिला शूटनंतर हायपोथर्मिया झाला होता. हायपोथर्मियामध्ये व्यक्तीच्या शरीरातील तापमान ३५ डिग्री सेल्सियसपेक्षा कमी होते.

हेही वाचा : जेव्हा भारतीय तरुणी चीनमध्ये सुंदर लाल साडी नेसून फिरते… चिनी लोक पाहतच राहिले; पाहा व्हायरल व्हिडीओ

व्हिडीओ शेअर करत आर्याने कॅप्शमध्ये लिहिलेय, “तुम्ही असं काही करण्याचं धाडस कराल. मी थंडीने मरत होती पण आम्हाला दोघांच्या वॉकिंग शॉटचे शूट करायचे होते. नंतर मला हायपोथर्मिया झाला. असे वाटत होते की कोणीतरी माझ्या हातावर अॅसिड टाकत आहे. मला ही थंडी सहन होत नव्हती. मला आनंद आहे तिथे अशा परिस्थितीत माझे मित्र माझ्या बरोबर होते.

aaryavora या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर पाच लाखांहून अधिक लाइक्स आले असून अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. एका युजरने लिहिलेय, “व्हायरल होण्यासाठी जीव धोक्यात टाकण्यात कोणता समजूतदारपणा आहे. हल्ली सोशल मीडिया सर्वकाही खराब करत आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “एवढ्या कमी तापमानात फोटो शूट करणे मुर्खपणा आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “सोशल मीडियावर दाखवण्यासाठी असं काही करू नका”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral video a influencer doing pre wedding photoshoot in minus 22 degrees celsius by watching shocking video netizens reacted ndj