Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल झालेले आपण पाहतो. त्यातील काही व्हिडीओंमुळे आपले मनोरंजन होते; तर काही व्हिडीओंमुळे आपला थरकाप उडतो. आतापर्यंत आपण थरकाप उडविणारे असे अनेक व्हिडीओ पाहिले आहेत. दरम्यान, आतादेखील असाच एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होतोय; जो पाहून तुम्ही अवाक व्हाल.
समाजमाध्यमांवर जंगलातील प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असे व्हिडीओ पाहण्यासाठी युजर्सदेखील मोठ्या प्रमाणात पसंती देतात. जंगलातील अनेक गोष्टी बऱ्याचदा आपल्यासाठी खूप नवीन आणि आश्चर्यचकित करणाऱ्या असतात. त्यातील अनेक प्राणी आपण न पाहिलेलेदेखील असतात. आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओंमध्ये असेच काहीसे पाहायला मिळत आहे; जे पाहून तुम्हीही भारावून जाल.
काय घडलं व्हिडीओमध्ये? (Viral Video)
हा व्हायरल व्हिडीओ परदेशातील एका जंगलातील असून यावेळी व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, झाडाझुडपांमधून एक भलीमोठी मगर रस्ता ओलांडताना दिसत आहे. त्यानंतर ती हळूहळू तलावामध्ये जाते. यावेळी एक व्यक्ती हा व्हिडीओ शूट करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
या व्हायरल व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ X(ट्विटर) वरील @Nature is Amazing या अकाउंटवरूनवर शेअर करण्यात आला आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत सात दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्सही मिळाल्या आहेत.
पाहा व्हिडीओ: (See Video)
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत (Viral Video Comments)
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय की, मला हे आवडतं की, निसर्गानं मगरींना चांगलं डिझाईन केलं आहे आणि ते काही वर्षांत बदललेलं नाही. दुसऱ्या युजरने लिहिलेय की, मला वाटतंय मगर नाराज आहे. तिसऱ्या युजरने लिहिलेय की, कासव वेगवान असतात. जसे तुम्ही बघू शकता. तर आणखी एका व्हिडीओमध्ये लिहिलंय की, बरं झालं मित्रा; तिनं तुला खाल्लं नाही.
दरम्यान, यापूर्वी देखील अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ज्यात एक मगर चक्क मानवी वस्तीत आलेली दिसली होती. तर आणखी एका व्हिडीओमध्ये मगरीने मोठ्या चतुराईने हरणाची शिकार केली होती.