Lepord Viral Video: सोशल मीडियावर नेहमीच प्राण्यांचे विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात, ज्यात अनेकदा प्राण्यांचे मजेशीर तर कधी थरारक व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात. हे व्हिडीओ क्षणात लाखो व्ह्यूज मिळवतात. पण, या हिंस्र प्राण्यांचे व्हिडीओ जंगलातील असतात, ज्यात ते इतर प्राण्यांची शिकार करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, पण यात एका बिबट्याने मानवी वस्तीत शिरकाव केल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

माणसांप्रमाणेच प्राणीदेखील आपली भूक भागविण्यासाठी काही ना काहीतरी करत असतात. अनेकदा जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक मिटविण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करतात, तर अनेकदा ते जंगल सोडून मानवी वस्तीतही शिरकाव करतात. खेड्यात असे प्रकार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्येदेखील असंच काही पाहायला मिळत आहे. हा धडकी भरवणारा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

Fact check video boy remove a nut and bolt from huge pole
VIDEO: धक्कादायक! भरदिवसा तरुणाने कापल्या विजेच्या खांबाचे केबल्स अन् नट; पण घटनेची खरी बाजू काय?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
traffic jam at Ghodbunder road , thane
कोंडीच्या चक्रव्यूहात घोडबंदरकर, सलग दुसऱ्या दिवशी वाहतुक कोंडी, वाहन चालकांकडून संताप व्यक्त, महिला प्रवासी रडकुंडीला
Maruti Suzuki Alto and S-Presso price dropped get dropped in this festival offer
सणासुदीत स्वस्तात कार घ्यायचीय? Maruti Suzukiच्या ‘या’ गाड्या झाल्या स्वस्त, किंमत वाचून व्हाल थक्क
Dombivli, local train passenger rescued
डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट-रूळाच्यामध्ये अडकलेली महिला प्रवाशांच्या सतर्कतेमुळे बचावली
Bhandup, security guard, Security Guard Brutally Beaten to Death, murder, gym trainer, entry dispute, Dream Society, Mumbai, arrest, police
इमारतीमध्ये जाण्यास रोखल्याने सुरक्षा रक्षकाची हत्या
case against three in mumbai for kidnapping tailor
मुंबई: ‘डिझाइन’चोरल्याच्या संशयावरून मारहाण, एक लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
passenger gold Jewellery worth rs 2 75 lakh stolen in bus traveling in a konduskar travels from kalyan
कल्याण-कोल्हापूर कोंडुस्कर ट्रॅव्हल्सच्या बसमध्ये प्रवाशाचा ऐवज चोरीला

काय घडलं व्हिडीओमध्ये? (Lepord Viral Video)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक बिबट्या अचानक बंगल्याच्या गेटवरून उडी मारून बाहेर येतो आणि रस्त्यावर उभ्या असलेल्या गाडीवर हल्ला करतो. सुदैवाने यावेळी गाडीच्या सर्व काचा बंद होत्या. गाडीवर हल्ला करूनही काहीच हाती लागत नाही, त्यामुळे बिबट्या तिथून पळ काढतो. सध्या हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @shaikchand747 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून त्यावर आतापर्यंत एक मिलियनहून अधिक व्ह्यूज आणि यावर सात लाखांहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. तसेच या व्हिडीओवर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘याला म्हणतात अमरप्रेम…’ पत्नीच्या निधनानंतर आठवणीत बांधले मंदिर; VIDEO पाहून डोळ्यांत येईल पाणी

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरनं लिहिलंय, “त्या व्यक्तीचे नशीब चांगले म्हणून गाडीच्या खिडक्या बंद होत्या.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “मला वाटतंय ही नाशिकमधली घटना आहे”, तर तिसऱ्या युजरनं लिहिलंय, “बिबट्याला किडनॅप व्हायचं होतं.” आणखी एका युजर्सने लिहिलंय की, “बिबट्या खूप भयानक प्राणी आहे.”

दरम्यान, यापूर्वीदेखील प्राण्यांचे मानवी वस्तीतील अनेक व्हिडीओ व्हायरल झाले होते, ज्यात त्यांनी घरातील पाळीव प्राण्यांवर हल्ला केल्याचे दिसले होते.