Viral Video: सोशल मीडियावर नेहमी विविध व्हिडीओ आपल्या नजरेस पडतात. त्यात अनेकदा प्राण्यांचे व्हिडीओ पाहायला मिळतात. बऱ्याचदा जंगलातील प्राण्यांच्या या व्हिडीओंमध्ये कधी हिंस्र प्राणी इतर प्राण्याची शिकार करताना दिसतात; तर अनेकदा काही प्राणी एकमेकांसोबत खेळताना दिसतात. सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये चक्क दोन हिंस्र प्राणी एका शिकारीसाठी एकमेकांशी भांडताना दिसत आहेत.

वाघ, बिबट्या, सिंह किंवा चित्ता हे जंगलातील हिंस्र प्राणी नेहमीच इतर प्राण्यांची शिकार करतात. प्राण्यांची शिकार करण्यासाठी या हिंस्र प्राण्यांना अनेक प्रयत्न करावे लागतात. अनेकदा शिकार करणं त्यांच्यासाठी खूप सोपं असतं, तर अनेकदा त्यांना त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. मेहनतीने मिळवलेला घास जर कोणी दुसरा घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा किती संताप होतो. हे आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओतही बिबट्याचा असाच संताप होत आहे, जो पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
Rajasthan: Viral VIDEO Shows Child Seated On Speeding Car's Bonnet For Instagram Reel In Jhalawar
“रिल पुन्हा बनवता येईल लेकरु गेलं तर?” मुलाला धावत्या कारच्या बोनेटवर बसवून रील शूट; VIDEO पाहताना श्वास रोखून धराल
Groom dance for bride on hoshil ka ya pathyachi sobar gharwali marathi song video goes viral on social media
VIDEO: “बायको पाहिजे नखरेवाली” मराठमोळ्या गाण्यावर नवरदेवाचा भन्नाट डान्स; काय ते प्रेम, काय तो डान्स…आहाहा!
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
Shocking video Tamilnadu video biker came in front of Truck driver not stop vehicle shocking video viral
“अरे हे ट्रक चालक सुधारणार तरी कधी?” घाटात अक्षरश: हद्दच पार केली; थरारक VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?

हेही वाचा: ‘भूक भागवण्यासाठी संघर्ष…’ शिकार हातातून निसटताच वाघ चवताळला… थरारक VIDEO एकदा पाहाच

पाहा व्हिडीओ:

हा व्हायरल व्हिडीओ एका जंगलातील असून, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता की, एक बिबट्या मेहनतीने एक शिकार मिळवतो. तो शिकार पकडून खाणार इतक्यात एका सिंहाचा शावक तिथे येतो आणि बिबट्याला बाजूला करण्याचा प्रयत्न करते. यावेळी बिबट्या आणि सिंहाचा शावक यांच्यामध्ये भांडण सुरू होते. एका शिकारीसाठी हे दोघं करत असलेलं भांडण पाहून नेटकरी व्हिडीओवर अनेक कमेंटस् करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @documentaries51214 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून, त्यावर आतापर्यंत जवळपास १५ हजारांहून अधिक व्ह्युज आणि अनेक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय यावर अनेक युजर्सही कमेंट्स करताना दिसत आहेत.

Story img Loader