मुलांना लहानाचं मोठं करताना त्यांना हव्या त्या गोष्टी मिळवून देण्यासाठी प्रत्येक आई वडील अगदी जीवाचं रान करतात. ही मुलं मोठी झाल्यावर आई-वडिलांना त्यांनी अगदी छोटीशी भेट जरी दिली तर त्यांच्या आनंद गगनात मावत नाही इतका मोठा असतो. अशा अनमोल आनंदाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मुलगा आपल्या आईसाठी स्मार्टफोन खरेदी करतो आणि हे पाहून आईच्या चेहऱ्यावरचा झळकणारा आनंद स्पष्टपणे दिसून येतो. यावेळी आईच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून तुमचं मन सुद्धा पिघळून जाईल. हा व्हिडीओ अभिनेता आर. माधवनने त्यांच्या ट्विटर अकाउंटवरून रिट्विट केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत अससेला हा व्हिडीओ विग्नेश संम्मू नावाच्या युजरने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केला होता. त्यानंतर अभिनेता आर माधवनने ५ जानेवारीला हा व्हिडीओ रिट्विट केला आणि आतापर्यंत या व्हिडीओला ४ लाखांहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. हा व्हिडीओ शेअर करताना युजरने तमिळमध्ये एक कॅप्शन देखील लिहिलीय. यात त्याने लिहिलंय की, ‘बॅगमध्ये ८,८०० रुपये किंमतीचा फोन होता, पण माझ्या आईला जो आनंद झाला त्याची किंमत नाही.’ हा फोन या युजरने त्याच्या आईच्या वाढदिवसाला गिफ्ट केला आहे.
आणखी वाचा : बाबो! पैशांसाठी लहान मुलीने खाल्ली हिरवी मिरची? जाणून घ्या VIRAL VIDEO मागचं सत्य
या व्हायरल व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, पिशवीत लेकानं काय काय आणलंय, हे आई पाहताना दिसून येत आहे. पिशवीतलं सगळं सामान काढल्यानंतर तिला मोबाईलचा एक बॉक्स दिसतो. हे पाहून आईला फार आनंद होतो. लेकानं आपल्यासाठी मोबाईल फोन आणलाय याचा आनंद आईच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकताना दिसून येत आहे. यावेळी आईच्या डोळ्यातून आनंदाश्रु देखील येताना दिसून येत आहे. हा भावूक क्षण युजरने त्याच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडीओ बघता बघता व्हायरल देखील झाला. हा व्हिडीओ पाहून अनेकांची मन हळवी होत आहेत, तर काहींनी आपल्या भावूक प्रतिक्रिया देखील व्यक्त केल्या आहेत.
आणखी वाचा : VIRAL VIDEO : डान्स करता करता स्टेजवरच भांडू लागल्या मुली, जो सोडवायला आला त्याला सुद्धा धू धू धुतलं!
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : VIRAL VIDEO : “तू मोठा होऊन काय बनशील?” या प्रश्नावर मुलाने जे उत्तर दिलं ते ऐकून तुम्ही पोट धरून हसाल, एकदा पाहाच
फक्त सोशल मीडियावर नेटीझन्सच नव्हे तर बॉलिवूड अभिनेता आर. माधवनने सुद्धा त्याच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करण्याचा मोह आर माधवनला सुद्धा आवरता आला नाही. हा व्हिडीओ शेअर करताना त्याने एक भावनिक प्रतिक्रिया देखील दिलीय. ‘या आनंदाची किंमत नाही’ अशी कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केलाय.