Viral Video: मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो लोक तारेवरची कसरत करीत प्रवास करतात. अनेकदा गर्दीमुळे काही जण ट्रेनच्या दाराला लटकून प्रवास करतात. या लोकल ट्रेनच्या गर्दीतील अनेक व्हिडीओ सतत सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यात अनेकदा महिलांमध्ये जागेवर बसण्यावरून झालेली भांडणं दिसतात; तर कधी ट्रेनमध्ये चढण्या-उतरण्यावरून मारामारी पाहायला मिळते. अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. दरम्यान, आतादेखील लोकल ट्रेनमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; जो पाहून तुम्हीदेखील अवाक व्हाल.
आतापर्यंत लोकल ट्रेनमध्ये विशेषतः महिलांच्या डब्यात जागेवर, ट्रेनमध्ये चढण्यावरून, उतरण्यावरून किंवा एकमेकींना धक्का दिल्यामुळे भांडणं झालेली तुम्ही पाहिली असतील. सध्या व्हायरल व्हिडीओमध्येही अचानक ट्रेनमध्ये इमर्जन्सी आहे, असे म्हणत ट्रेनची चेन खेचण्यात आली. पण जेव्हा त्यामागचे खरे कारण समोर आले, ते पाहून तेथील उपस्थित पोलिसही चकित झाले.
या व्हायरल व्हिडीओमध्ये लोकल ट्रेनमधील महिलांच्या डब्यामध्ये गर्दी झाली असून अचानक महिला मोठमोठ्याने ओरडू लागल्या, तर काही जणी सीटवर उभ्या राहिल्या. कारण- त्यावेळी लेडीज डब्यामध्ये उंदीर चढला होता. उंदराला पाहून सर्व महिला घाबरून आरडाओरड करू लागल्या आणि त्यांनी इमर्जन्सी आहे म्हणत ट्रेनची चेन खेचली. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @_pranali_kadam_24 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करीत कॅप्शनमध्ये ‘इमर्जन्सी म्हणून कळवा स्टेशनला चेन खेचण्यात आली. लेडीज डब्यामध्ये सगळ्या बायका-पोरी किंचाळत होत्या. काही जणी तर सीटवर उभ्या राहिल्या. खूप मोठी इमर्जन्सी आली. का तर लेडीज डब्यात उंदीर चढला. रेल्वेमंत्री लक्ष द्या जरा. उंदीर कसे चढू शकतात बघा’, अशी गमतीशीर कॅप्शन लिहिण्यात आली आहे.
हेही वाचा: “पंछी बनू उड़ती फिरूँ…” पप्पांच्या परीला स्टंड पडलं महागात; Viral Video पाहून नेटकरी संतापले
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओवर आतापर्यंत जवळपास एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि दोन हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक जण यावर कमेंट्स करतानाही दिसत आहेत. एका युजरनं लिहिलंय, “मेल उंदीर डब्यात चढला वाटतं” तर आणखी एकानं लिहिलंय, “उंदीर कसा काय जाईल (तो तर male आहे ना) घूस असायला हवी होती (ती female आहे ना)”, तर आणखी एकानं लिहिलंय, “उंदराकडे तिकीट होतं का?”, तर आणखी एकानं लिहिलंय, “उंदीर डब्यात नाही, तर तुम्ही त्याच्या डब्यात आला आहात”, अशा प्रकारच्या मजेशीर कमेंट्स या व्हिडीओवर युजर्स करीत आहेत.