Viral Video: समाजमाध्यमांवर रेल्वेस्थानकावरील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये कधी अपघाताचे, तर कधी भांडणाचे व्हिडीओ असतात. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे; ज्यामध्ये एका व्यक्तीचा चालू ट्रेनमध्ये चढता चढता अचानक पाय घसरला आणि तो फलाट व पटरी यांच्यामध्ये अडकला. त्यावेळी त्या फलाटावर उपस्थित असलेल्या एका महिला कॉन्स्टेबलने त्याचा जीव वाचवला.
हा व्हिडीओ हरिद्वारच्या लक्सर रेल्वेस्थानकावरील असून, हा प्रवासी कोलकाता जम्मू तावी एक्स्प्रेसमध्ये चढताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये हा प्रवासी काही पदार्थ घेण्यासाठी फलाटावर उतरला होता. पदार्थ घेऊन तो परतणार तेवढ्यात ट्रेन चालू झाली आणि तो जोरात धावू लागला, धावता धावता अचानक तो पाय घसरून खाली पडला आणि फलाट व पटरी यांच्यामध्ये अडकला. पडलेल्या व्यक्तीला पाहून त्या फलाटावर उपस्थित असलेल्या महिला कॉन्स्टेबलने त्याला पकडले आणि त्याचा जीव वाचवला. यावेळी फलाटावरील इतर लोकदेखील गोळा झाले आणि त्याचा जीव वाचविण्यासाठी महिला कॉन्स्टेबलला मदत करू लागले.
हेही वाचा: VIDEO : घाबरलेल्या भावाला अशी केली मदत; श्वानांचं बंधू प्रेम पाहून युजर्सही झाले भावूक
पाहा व्हिडीओ:
हा व्हायरल व्हिडीओ x (ट्विटर)वरील @sirajnoorani या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, हा व्हिडीओ शेअर करीत त्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये लिहिलेय, “हरिद्वारच्या लक्सर रेल्वेस्थानकावर एक प्रवासी हातात काही पदार्थ घेऊन फलाटावर उभ्या असलेल्या कोलकाता जम्मू तावी एक्स्प्रेसमध्ये चढत असताना त्याचा पाय घसरला आणि तो फलाट व पटरी यांच्यामध्ये अडकला. यावेळी उमा नावाच्या महिला कॉन्स्टेबलने त्याचा जीव वाचवला.”
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, या व्हिडीओला बऱ्याच व्ह्युज मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक जण या व्हिडीओवर प्रवाशाचा तत्परतेने जीव वाचविल्याबद्दल कॉन्स्टेबलचे कौतुक करताना दिसत आहेत.