Viral Video: समाजमाध्यमांमुळे अनेक विविध विषयांवरील आधारित व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळतात, ज्यातील काही व्हिडीओ आपले मनोरंजन करणारे, आपल्याला मनमुराद हसवणारे असतात; तर काही व्हिडीओ आपला आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणारे असतात. शिवाय काही नकळत शूट केलेले सुंदर व्हायरल व्हिडीओ पाहून आपण भावूक होतो. अशा विविध व्हिडीओंमध्ये आता आणखी एका सुंदर व्हिडीओची भर पडलेली आहे. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरीही भावूक झाले आहेत.

या जगात आई आणि तिच्या लेकरांचं नातं खूप अनमोल असतंच, पण
बाप-लेकीचं नातंही नेहमीच खूप खास समजलं जातं. बाप गरीब असो वा श्रीमंत तो आपल्या लेकीला नेहमीच त्याच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपतो. प्रत्येक बापासाठी आपली लेक राजकुमारी असते. असं म्हणतात, एखाद्या मुलीवर तिच्या वडिलांएवढे प्रेम जगात कोणीच करू शकत नाही. शिवाय मुलीदेखील आपल्या वडिलांना खूप जीव लावतात. त्यांच्यासाठी अनेक गोष्टी करतात, वडिलांनी दिलेली प्रत्येक गोष्ट मुलीसाठी खूप खास आणि लाखमोलाची असते. आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्येदेखील असंच काहीतरी पाहायला मिळत आहे, जे पाहून तुम्हीही भारावून जाल.

हा व्हायरल व्हिडीओ मुंबईतील एका स्थानकावरील असून यावेळी फलाटावर एक व्यक्ती आपल्या लेकीबरोबर सामान घेऊन उभा असल्याचे दिसत आहे. यावेळी तिचे बाबा तिला लाडाने जवळ घेतात, नंतर तिला बसण्यासाठी शाल अंथरून देतात. बाप-लेकीच्या प्रेमाचा हा सुंदर क्षण दाखवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, तसेच हा व्हिडीओ शेअर करणाऱ्या व्यक्तीने कॅप्शनमध्ये “दिवसभर डोंबाऱ्याचा खेळ खेळून दमलेल्या लेकीला जवळ घेताना बाप”, असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा: ‘भावा, जीव गेला की तो परत येत नाही…’ धबधब्यावर रील बनवणाऱ्या तरुणाचा पाय घसरला; पुढे जे घडलं VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @dinu_mohite या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत जवळपास सहा लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. हजारो लाइक्सही मिळाल्या आहेत. शिवाय यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलंय की, “ज्या घरात मुली असतात ते घरदेखील स्वर्गापेक्षा कमी नसतं.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “दादा, होता होईल तेवढी शाळा शिकवा त्या मुलीला, भविष्यात कल्याण होईल.” तर आणखी एकाने लिहिलंय की, “देवा, सुखी ठेव या दोघांना नेहमी”, तर आणखी एका व्यक्तीने लिहिलंय की, “त्यांच्या आयुष्यातला अनमोल क्षण आहे.”