Viral Video : समुद्र किनाऱ्यावर वावरताना सतर्क राहण्याचे नेहमी आवाहन केले जाते. अनेकदा सोशल मीडियावर समुद्राच्या लाटेत लोकं वाहून गेल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला समुद्र किनारी उभी असते. पुढे या महिलेबरोबर असं काही होतं की क्षणभरासाठी तुमच्याही अंगावर काटा येईल.
या व्हायरल व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक साडी नेसलेली महिला समुद्राच्या किनाऱ्यावर उभी असते आणि तिच्या पाठीमागे एक तरुण उभा असतो. अचानक एक लाट येते. लाटेला बघून या महिलेच्या मागे उभा असलेला तरुण पळून जातो पण ही महिला तिथेच उभी राहते.
ही लाट दुरून लहान आहे की मोठी याचा अंदाज लावता नाही पण जेव्हा ती लाट महिलेच्या अंगावरून जाते तेव्हा तिचा तोल जातो.
त्यामागोमाग पुन्हा एक दोन लाट येतात आणि महिला या लाटेबरोबर आत ओढली जाते. पुढे व्हिडीओत तुम्हाला दिसेल की समुद्र किनाऱ्यावर असलेला तरुण धावत येतो आणि या महिलेला वाचवण्याचा प्रयत्न करतो. हाताने तिला ओढून किनाऱ्यावर आणतो आणि थोडक्यात या महिलेचा जीव वाचतो. हा व्हिडीओ पाहून कुणाच्याही अंगावर शहारा येऊ शकतो.
dil_se_ram_offical या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “अशा घटना किती घडतात, तरीसुद्धा लोकं समुद्र किनाऱ्यावर वावरताना काळजी का घेत नाही?” तर एका युजरने लिहिलेय, “लाट पाहून महिलेने परत यायला पाहिजे होते.”