सीगल हा अतिशय बुद्धिमान पक्षी मानला जातो. त्याचे शरीर मजबूत असते, त्याला लांब चोच, लांब पाय आणि लांब पंख असतात. पांढऱ्या रंगाचे शरीर आणि करड्या रंगाचे पंख असणारा हा पक्षी दिसायला खूपच सुंदर दिसतो. मात्र सध्या असा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहिल्यावर तुम्ही या पक्ष्याच्या बुद्धीवरही प्रभावित व्हाल. हा व्हिडीओ पाहिल्यावर या पक्ष्याला बुद्धिमान पक्षी उगाचच बोलले जात नाही, यावर तुमचा विश्वास बसेल.

व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक सीगल पक्षी दुसऱ्या एका पक्ष्याच्या पाठीवर उभा राहिलेला आपण पाहू शकतो. विशेष म्हणजे हा सीगल दुसऱ्या पक्ष्याच्या पाठीवर उभा राहून उडत आहे. असे वाटते की त्याला उडण्याचा कंटाळा आला आहे. बुइटेंगेबिडेन नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आलेला व्हिडीओ अमेरिकेतील लिंकन काऊंटी येथे शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “सीगल फ्री राइड घेत आहे.”

Viral Video: दोन बैलांमध्ये झाली खतरनाक झुंज; मारामारी करत घरात घुसले आणि…; पाहा शेवटी कोण जिंकलं

सहा सेकंदांचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. आतापर्यंत जवळपास ११ लाखांहुनही अधिकवेळा हा व्हिडीओ पाहिला गेला आहे. तर ३९ हजारांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे. तसेच, इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. दरम्यान, एका पक्ष्याने दुसऱ्या पक्ष्याच्या पाठीवर बसून सवारी करण्याची ही घटना अतिशय दुर्मिळ आहे. त्यामुळेच लोकं हा व्हिडीओ पाहून थक्क झाले आहेत.

Viral : ‘हीच खरी मजा!’ बर्फाळ डोंगरावर घसरगुंडी खेळणाऱ्या गायीचा Video पाहून नेटकरी झाले खुश

या व्हिडीओचा कमेंट सेक्शन नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रियांनी भरून टाकला आहे. काहीजण यावर छान इमोजी टाकत आहेत तर काहींनी याची तुलना थेट नासाच्या एअरक्राफ्टशी केली आहे.

Story img Loader