Viral Video: दोन वेळचे पोटभर अन्न मिळविण्यासाठी प्रत्येक जण कष्ट करीत असतो. कष्ट करताना आलेल्या अडचणी, त्रास या सर्व गोष्टी सहन करण्याची ताकद अनेकांमध्ये असते. अनेक गरीब, अपंग व्यक्तीही काही ना काहीतरी काम करून पैसे कमावतात. खरंतर, माणूस पैसा किती कमावतो यापेक्षा तो समाजात जगताना स्वाभिमान तर गहाण ठेवत नाही ना, हे लक्षात घेणे अधिक महत्त्वाचे असते. पण, समाजात असे काही लोक आहेत, जे शरीराने धडधाकट असूनही फक्त जास्त पैसा कमावून श्रीमंत होण्यासाठी चोरी, लूटमार करतात. सोशल मीडियामुळे असे अनेक प्रकार वारंवार आपल्यासमोर येत असतात. आताही अशीच एक घटना समोर आल्याचे पाहायला मिळत आहे.

हल्ली लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन षड्यंत्रे आखून चोरी करतात. पण, अनेकदा अशा घटनांमध्ये महिलांचा जीव जातो, तर काहींना गंभीर दुखापतही होते. आतादेखील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात सुनसान रस्त्यावरून जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील चेन चोरण्यासाठी एक चोर आल्याचे पाहायला मिळत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रात्रीच्या वेळी सुनसान रस्त्यावरून एक महिला एकटी जात असून यावेळी बाजूच्या झाडीतून अचानक तरुण चोर तिथे येतो आणि महिलेला रस्त्यावर पाडून तिच्या गळ्यातील चेन चोरी करून पळून जातो. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ:

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @kumudamnews24x7 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत लाखो व्ह्युज आणि हजारो लाइक्स आल्या आहेत. त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करीत आहेत. एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “भल्याचा जमाना राहिला नाही” आणखी एकाने लिहिलेय, “असुरक्षित भारत” आणखी एकाने लिहिलेय, “दागिने घालून फिरणं बंद करायला हवं.”