Viral Video: समाजमाध्यमांवर सतत विविध विषयांवर आधारित व्हिडीओ आपण पाहतो. त्यात अनेकदा आपल्या काळजाचा ठोका चुकविणारे स्टंटचे व्हिडीओ पाहायला मिळतात. हल्ली सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळविण्यासाठी अनेक जण विविध प्रकारचे स्टंट करतात. अनेकदा बाईक किंवा इतर कोणतेही वाहन चालवताना असे जीवघेणे स्टंट करण्याचा ट्रेंड तयार झाला आहे. पण, आता व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक चिमुकला जीवघेणा स्टंट करताना दिसतोय; जे पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत.

बालपणीचे दिवस हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील अनमोल क्षण असतात. या दिवसांमध्ये मुले खेळतात, बागडतात. एकंदरीत आयुष्यातील सर्वांत सुंदर काळ मुले जगतात. सोशल मीडियावरही लहान मुलांचे अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात; ज्यात काही मुलं कधी एखादं गाणं गाताना, डान्स करताना किंवा एखादी कला सादर करताना दिसतात. पण, आता सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा यात्रेतील पाळण्यावर जीवघेणा स्टंट करताना दिसतोय.

tula shikvin changalach dhada adhipati defends mother akshara feels helpless
भुवनेश्वरीचा डाव यशस्वी! अक्षरा घर सोडून जाणार? अधिपतीने धरले आईचे पाय; म्हणाला, “आमच्या आईसाहेब…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
court sentences man to 20 year imprisonment for sexually assaulting girl by making false marriage promise
पुणे: लग्नाचं आमिष दाखवणं पडलं महागात; लैंगिक अत्याचारा प्रकरणी ‘या’ न्यायालयाने सुनावली वीस वर्षाची शिक्षा
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Salman Khan
‘दबंग’ रिलोडेड लाइव्ह कॉन्सर्टसाठी सलमान खान सज्ज; म्हणाला, “स्टेजवर जाण्याआधी कपडे…”
Ageing affects your stomach
वय वाढल्यामुळे वारंवार पोटाचे आजार होतायत? वृद्धत्वामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो ‘असा’ परिणाम; वाचा, तज्ज्ञांचा सल्ला…
buldhana ambulance driver death loksatta news
‘त्याने’ अनेकांचे प्राण वाचविले; पण त्याचा जीव धोक्यात आला तेव्हा….
kangana rananut call vikrant massey cockroach
एकेकाळी ज्याला म्हटलं ‘झुरळ’, आता त्याच अभिनेत्याच्या चित्रपटाचं खासदार कंगना रणौत यांनी केलं कौतुक; म्हणाल्या…

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकला यात्रेतील पाळण्यामध्ये चढून त्यावर स्टंट करताना दिसतोय. चिमुकल्याचे हे जीवघेणे स्टंट पाहून आजूबाजूला असलेले लोक त्याच्याकडे आश्चर्याने पाहताना दिसत आहेत. यावेळी तो पाळण्यावर चढतो आणि त्यानंतर वर चढून, गोल फिरून पुन्हा खाली उडी मारतो. हा व्हिडीओ पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @rahmanbhai786r या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत दोन दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि दीड लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच त्यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: ‘शेतकऱ्याच्या लेकराचं नितळ प्रेम…’ गोठ्यातील गाईबरोबर चिमुकल्यानं काय केलं ते पाहाच; VIDEO व्हायरल

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या व्हिडीओवर कमेंट्स करीत एका युजरनं लिहिलंय, “हा बहुतेक पाळणावाल्याचा मुलगा आहे.” दुसऱ्या युजरनं लिहिलंय, “कशासाठी अशा प्रकारचे स्टंट करून जीव धोक्यात घालायचा.” आणखी एकानं लिहिलंय, “माणसाची परिस्थिती त्याला असं करण्यास भाग पाडते.” आणखी एकानं लिहिलंय, “गरीब परिस्थिती माणसाला हतबल बनवते.”

Story img Loader