Viral Video: हल्लीची लहान मुलं खूप अॅडव्हान्स झाली आहेत, त्यांना लहान वयातच आवडीचे पदार्थ, आवडीच्या गोष्टी, आवडते छंद कोणते याची जाणीव होते. ज्यात काहींना गाणं गायची आवड असते, तर काहींना अभिनय करायला आवडतो, तसेच बऱ्याच जणांना डान्स करायला आवडतो. त्यामुळे ते त्यांच्या आवडीचे छंद लहानपणापासूनच जोपासतात. सोशल मीडियावरील रील्सच्या माध्यमातून ते आपली कला सादर करतात. आतापर्यंत तुम्ही अशा अनेक टॅलेंटेड मुलांचे व्हिडीओ पाहिले असतील. दरम्यान, आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय; ज्यात एक लहान चिमुकली भन्नाट डान्स करताना दिसत आहे.
एखादं नवीन गाणं असो किंवा चित्रपटातील नवीन डायलॉग हे सर्व सोशल मीडियावर चर्चेत आलं की, त्यावर लाखो लोक रील्स बनवतात. पण, अनेकदा जुन्या चित्रपटांतील गाणीदेखील सोशल मीडियावर खूप चर्चेत येतात; ज्यावर लाखो लोक रील्स बनवतात. सध्या एक चिमुकली एका हिंदी गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या चिमुकलीचा हा डान्स खूप चर्चेत आला आहे.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक चिमुकली शाळेच्या वार्षिक समारंभात इतर विद्यार्थ्यीनींबरोबर उभी असून यावेळी एक हिंदी गाणं सुरू होतं. गाण्याचा आवाज ऐकताच चिमुकली आणि इतर मुलीदेखील डान्स करायला सुरूवात करतात. पण, त्यात या चिमुकलीच्या डान्सने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. या गाण्यावर तिच्या सुंदर स्टेप्स पाहून अनेकजण अवाक् झाले आहेत. तिचा हा भन्नाट डान्स खूप व्हायरल होत आहे.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @danktobe या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत चार लाखाहून अधिक व्ह्युज आणि पंधरा हजारहून अधिक लाइक्सही मिळाल्या आहेत. त्याशिवाय अनेक जण या व्हिडीओवर कमेंट्स करताना दिसत आहेत.
हेही वाचा: “अरे, काय नाचतेय ही…”, ‘सुसेकी’ गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून युजर्स करतायत कौतुक
पाहा व्हिडीओ:
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “या वयाचा असताना मी चप्पल उलटी घालायचो.” दुसऱ्या युजरने चिमुकलीचे कौतुक केले आहे. तर तिसऱ्या युजरने, “ही माझ्यापेक्षा भारी नाचतेय.”, अशी कमेंट केली आहे. चौथ्या युजरने, “मी नवीन कपडे घाल्यावर असाच नाचतो.”
दरम्यान, यापूर्वीदेखील अनेक लहान मुलांच्या डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते; जे पाहून युजर्सही त्यांचे खूप कौतुक करताना दिसले होते.