Viral Video: समाजमाध्यमांवर गावाकडच्या शाळांमधील अनेक सुंदर व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओंमध्ये शिक्षक त्यांच्या विद्यार्थ्यांसह सुंदर नृत्य करताना दिसतात, तर कधी कविता म्हणताना दिसतात; तर कधी विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारच्या कला सादर करताना दिसतात. त्यामध्ये कधी ते सुंदर डान्स करताना, तर काही जण सुंदर भाषण करताना दिसतात. असे सुंदर व्हिडीओ पाहिल्यावर अनेकांना आपल्या शाळेतील सुंदर दिवस आठवतात. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची वेगळी पद्धत पाहायला मिळते. सध्या असाच एक व्हिडीओ खूप चर्चेत आला आहे, जो पाहून तुम्हीही कौतुक कराल.
शहरातील मोठमोठ्या शाळांतील शिक्षक असोत किंवा एखाद्या खेडेगावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकवणारे शिक्षक असोत; प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत खूप वेगवेगळी असते. गावाकडच्या अनेक शाळांमध्ये शिक्षणाबरोबर इतर आवड निर्माण करणाऱ्या गोष्टीही शिकवल्या जातात. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये शिक्षक आपल्या शाळेतील मुलांबरोबर सहलीला गेले असून, यावेळी त्यांच्याबरोबर एक सुंदर गाणं गाताना दिसत आहेत.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पाचवीच्या विद्यार्थ्यांसह सहलीला गेलेले शिक्षक आपल्या काही विद्यार्थ्यांसह ही दोस्ती तुटायची नाय या गाण्यावर गाणं गाताना दिसत आहेत. हा सुंदर व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून, नेटकरीही त्यावर अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @lahuborate या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना, “ही दोस्ती तुटायची नाय… ये दोस्ती हम नही तोडेंगे… डोंगरावर निसर्ग सहलीला गेल्यानंतर इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी खूप भावनिक केलं. सहा महिन्यांनंतर ती शाळा सोडून जाणार आहेत. सर, आम्हाला परत असं सहलीला येता येईल का हो? ही मज्जा अनुभवता येईल का? अशा स्वरूपाचे अनेक प्रश्न त्यांनी विचारले. गेलेला क्षण आयुष्यामध्ये परत येत नाही. म्हणून प्रत्येक क्षण भरभरून जगून घ्यावा, हेच त्या दिवशी उमगलं. वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही. ती अखंडपणे चालू राहते. आयुष्यातील प्रत्येक क्षण आठवणींनी रंगवायचा असतो यालाच जीवन म्हणतात” असे छान विचार कॅप्शनमधून व्यक्त करण्यात आले आहेत.
पाहा व्हिडीओ:
या व्हिडीओवर आतापर्यंत ४० हजारांहून अधिक व्ह्युज आणि हजारांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करतानाही दिसत आहेत.
युजर्सच्या कमेंट्स चर्चेत
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलेय, “आमच्या वेळचे गुरुजी नुसते मार द्यायचे. आजकालची पोरं लय नशीबवान आहेत. नाही तर आमचं गुरुजी छडी लागे छम छम, विद्या येई घम घम.” दुसऱ्या युजरने लिहिलेय की, “देवा मला पुन्हा लहान कर… आणि हे गुरुजी मला शिक्षक म्हणून मिळावेत.” तिसऱ्या युजरने लिहिलेय, “अप्रतिम खूप सुंदर व्हिडीओ बनवलात. तुमच्या कार्याला सलाम.” इतर युजर्स शिक्षकांचे कौतुक करीत आहेत.